Mumbai Test | Shubman Gill चा रंपाट फोर, स्टेडियममध्ये 'सचिन-सचिन' घोषणा, का?

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने घट्ट पकड मिळवली आहे. 

Updated: Dec 5, 2021, 05:23 PM IST
Mumbai Test | Shubman Gill चा रंपाट फोर, स्टेडियममध्ये 'सचिन-सचिन' घोषणा, का? title=

मुंबई : न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने दुसरा डाव 276 धावांवर घोषित केला. विराटसेनेला दुसऱ्या डावात 264 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 540 धावांचे मजबूत आव्हान मिळाले आहे. (ind vs nz 2nd test shubman gill hit four on tim southee bowling and crowd chants sachin sachin at wankhede stadium mumbai)

टीम इंडियाकडून मयांक अग्रवालने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल या दोघांनी 47 धावांचती खेळी केली. गिलचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. मात्र त्याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. 
 
नक्की काय झालं? 

गिलने आपल्या 47 धावांच्या खेळीदरम्यान एक क्लास फोर लगावला. यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते 'सचिन...सचिन' अशा घोषणा द्यायला लागले. 

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 37 वी ओव्हर टीम साऊथी टाकायला आला. त्याने पहिला चेंडू हा राऊंड द विकेट टाकला.

या चेंडूवर गिलने बॅट खालच्या बाजूने झुकवत आपटी शॉट मारला. डिरेल मिचेलने हा चौकार रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केलं. पण ते का त्याला जमलं नाही. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सचिन सचिन अशा जोरजोरात घोषणा दिल्या.  

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर आणि गिल या दोघांची नावं अनेकदा जोडली गेली आहेत. नेटीझन्स अनेकदा गिलच्या चांगल्या कामगिरीनंतर सारा आणि गिल या दोघांची नावं जोडतात.     
 
सचिनकडून गिलचं कौतुक 

दरम्यान सचिनने गिलचं कौतुक करत त्याला काही सूचनाही केल्या आहेत. 

"खेळण्याच्या तंत्राबाबत म्हणायचं झाल्यास प्रत्येक खेळपट्टीवर विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.  शुबमनने ब्रिस्बेनमध्ये केलेल्या 91 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने कसोटी सामना जिंकला होता", असं सचिनने स्पष्ट केलं. तो एका वृत्तसंस्थेशी बोलत होता.   

"शुबमनकडे अवघड आणि बाऊन्स पीचवर खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या खेळण्याच्या तंत्राबाबत काहीच आक्षेप नाही. त्याने अनेकदा चांगली सुरुवात केली आहे. पण आता या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्याची वेळ आली आहे", असंही सचिन म्हणाला.  

"गिलने शतक पूर्ण करण्यासाठी दबाव घेऊ नये. कारण त्याच्यात धावांची भूक आहे. चांगल्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यासाठी गिलने एकाग्र राहायला हवं, त्याने ती एकाग्रता गमावता कामा नये. गिल कानपूर आणि मुंबई कसोटीत चांगल्या चेंडूवर बाद झाला. गिल सध्या शिकतोय", असं सचिनने नमूद केलं. 

न्यूझीलंडचा अर्ध संघ तंबूत

दरम्यान विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. न्यूझीलंडने 129 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहेत.