मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (India vs New Zealand) खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवालने Mayank Agarwal) शानदार शतक पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे मयांकने डेरल मिचेलच्या बॉलिंगवर चौकार ठोकत शतक पूर्ण केलंय. मयांकच्या कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलंय. विशेष म्हणजे टीम इंडिया अडचणीत असताना मयांकने निर्णायक क्षणी शानदार शतक झळकावलंय. (ind vs nz 2nd test 1st day Opener mayank agarwal complete his century at wankhede stadium at mumbai)
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग, डॅरेल मिचेल, रॉस टेलर, हेनरी निकोलस, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचीन रवींद्र, कायले जेमीन्सन, टीम साऊथी, विल्यम सोमरविल आणि अझाज पटेल.