IND vs NZ 2nd T 20 | न्यूझीलंडकडून टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान

न्यूझीलंडकडून सलामीवीर जोडी मार्टिन गुप्टील आणि डेरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावांची खेळी केली.

Updated: Nov 19, 2021, 09:05 PM IST
IND vs NZ 2nd T 20 |  न्यूझीलंडकडून टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान  title=

रांची | न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs NZ 2nd T 20) टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 153 धावा केल्या.  न्यूझीलंडकडून सलामीवीर जोडी मार्टिन गुप्टील (Martin Guptill) आणि डेरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. टीम इंडियाकडून पदार्पणवीर हर्षल पटेलने (Harshal Patel) 2 विकेट्स घेत चांगली सुरुवात केली. तर भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि दीपक चाहर या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. (Ind vs nz 2nd t 20i new zealand set 154 runs target for team india at jharkhand State Cricket Association Stadium)

मार्टिन गुप्टीलचा वर्ल्ड रेकॉर्ड

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टीलने (Martin Guptill) विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यासह गुप्टील टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. गुप्टीलने 11 वी धाव घेताच हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. गुप्टीलने 107 डावांमध्ये हा रेकॉर्ड केला. 

सामन्याआधी गुप्टीलला हा रेकॉर्ड करण्यासाठी 11 धावांची आवश्यकता होती. गुप्टीलने भुवनेश्वर कुमारच्या स्पेलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकत हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. गुप्टीलने या सामन्यात एकूण 15 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 31 धावांची आक्रमक खेळी केली. ताज्या आकडेवारीनुसार आता गुप्टीलच्या नावे 111 टी सामन्यात 3 हजार 248 धावांची नोंद आहे. 

टीम इंडियाचे शिलेदार | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, एम चॅम्पमॅन, ग्लेन फिलीप्स,  टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर,  एडम मिल्ने, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.