INDvsNZ 2nd T20I | पदार्पणात या घातक गोलंदाजाचा कारनामा, टी 20 मध्ये अशी कामगिरी करणारा 8 वा भारतीय

 टीम इंडियाने न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.   

Updated: Nov 20, 2021, 05:39 PM IST
INDvsNZ 2nd T20I | पदार्पणात या घातक गोलंदाजाचा कारनामा, टी 20 मध्ये अशी कामगिरी करणारा 8 वा भारतीय title=

रांची : टीम इंडियाने रांचीत झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात केली. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच टी 20 मालिकेत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. पदार्पणवीर हर्षल पटेल या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. हर्षलने यासह मानाच्या यादीत स्थान मिळवलंय. (ind vs nz 2nd t 20i faster bolwer  harshal patel become 8th indian who win man of the match award in t 20i debut at jharkhand state cricket association)

हर्षल टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पणात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. हर्षल अशी कामगिरी करणारा एकूण 8 वा भारतीय ठरला. हर्षलने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हर्षलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमधील 24 चेंडूपैकी एकूण 13 डॉट बॉल टाकले. म्हणजेच एकूण 13 चेंडूंमध्ये एकही धाव दिली नाही. 

टी 20 डेब्यूत सामनावीर ठरलेले भारतीय

दिनेश कार्तिक 

प्रज्ञान ओझा 

एस बद्रीनाथ 

अक्षर पटेल

बरिंदर सरानो

नवदीप सैनी

ईशान किशन

हर्षल पटेल.   

अजित आगरकरकडून कॅप

मोहम्मद सिराजला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे सिराजला या दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले. मात्र ही दुखापत हर्षलच्या पथ्यावर पडली. हर्षलला पदार्पणाची संधी मिळाली. हर्षलला खऱ्या अर्थाने त्याने आयपीएलच्या 14 व्या मोसमात केलेल्या कामगिरीचं बक्षिस मिळालं. 

हर्षलने आयपीएलच्या 14 व्या मोसमात गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला होता. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये एकूण 32 विकेट्स घेतल्या होत्या. यासह हर्षल आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला होता. 

हर्षलला सामन्याआधी सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या हस्ते कॅप देण्यात आली. यानंतर हर्षलचं सर्वांनी अभिनंदन केलं. 

मालिकाही जिंकली

दरम्यान या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिकाही जिंकली. टीम इंडियाने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 21 नोव्हेंबरला कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.