IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

Deepak Hooda: गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता. 

Updated: Jan 29, 2023, 11:30 PM IST
IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर! title=

IND vs NZ , Deepak Hooda: लखनऊच्या मैदानात आज पार पडलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. (IND vs NZ 2023 2ND T20I Glenn Phillips Wicket Deepak Hooda scolded in the LIVE match watch video)

गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. एकामागून एक गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या बॉटर्सला तंबूत पाठवलं. पांड्या, सुंदर, चहल, हुड्डा, कुलदीप आणि अर्शदीपने विकेट घेतल्या आणि भारताला पहिल्याच डावात विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. Finn Allen ला करत चहलने भारताला सुरूवात करून दिली. 

आणखी वाचा - IND vs NZ 2nd T20: जिंकलो रे... टीम इंडियाने लाज राखली; अटीतटीच्या सामन्यात पांड्याची स्मार्ट कॅप्टन्सी!

गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता. फिलिप्स दीपक हुडाच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळू पाहत होता, पण चेंडू सरळ त्याच्या स्टंपला लागला. हुड्डाने फिलिप्सला क्लीन बोल्ड केलं, ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे.

पाहा Video - 

दरम्यान, हुड्डाने जल्लोष करताना राग (Deepak Hooda scolded) व्यक्त केला. त्यावेळी त्याने विकेट घेतल्यावर शिवी दिली, असा आरोप सोशल मीडियावर (Social Media) केला जात आहे. विराट कोहली स्टाईलने त्याने आनंद साजरा केला. त्यामुळे आता  हुड्डाने खरोखर शिवी दिली का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा...