IND vs NZ 2nd T20: जिंकलो रे... टीम इंडियाने लाज राखली; अटीतटीच्या सामन्यात पांड्याची स्मार्ट कॅप्टन्सी!

India defeated New Zealand: अखेरच्या दोन बॉलवर तीन धावांची गरज होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवने चौकार खेचत सामना भारताच्या पारड्यात खेचला.

Updated: Jan 29, 2023, 10:48 PM IST
IND vs NZ 2nd T20: जिंकलो रे... टीम इंडियाने लाज राखली; अटीतटीच्या सामन्यात पांड्याची स्मार्ट कॅप्टन्सी! title=
IND vs NZ 2nd T20

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या अटीतटीच्या या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा गडी राखून पराभव केला आहे. अखेरच्या ओव्हरला 6 धावाची गरज होती. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पांड्या (hardik pandya) मैदानावर होता. तर सूर्यकुमार देखील 21 धावा करत खेळत होता. अखेरच्या दोन बॉलवर तीन धावांची गरज असताना सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) चौकार खेचत सामना भारताच्या पारड्यात खेचला. (IND vs NZ 2nd T20 Team India defeated New Zealand by 6 wickets)

भारतीय गोलंदाजांनी आज कमाल केली. एकामागून एक गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या बॉटर्सला तंबूत पाठवलं. पांड्या, सुंदर, चहल, हुड्डा, कुलदीप आणि अर्शदीपने विकेट घेतल्या आणि भारताला पहिल्याच डावात विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. त्यानंतर बाकीचं काम भारतीय फलंदाजांनी पूर्ण केलं. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  सर्वाधिक 26 धावा केल्या. तर ईशान किशनने (Ishan Kishan) 19 धावांची खेळी केली.

आणखी वाचा  - IND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावाच करू शकला. न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंना टीकू शकले नाहीत. त्यामुळे टीम 100 धावाचा पाठलाग करताना संघाला जास्त संघर्ष करावा लागला नाही.

 

दरम्यान, पहिल्या सामन्यात पराभव (IND vs NZ 1st T20) पत्कारावा लागल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलंय. त्यामुळे आता आगामी सामना दोन्ही संघासाठी करो या मरो असा असणार आहे. आगामी सामना जो संघ जिंकेल, त्याच्या खिशात मालिका जाणार आहे. त्यामुळे आता कॅप्टन पांड्याचं लक्ष पुढील सामन्यावर असेल.