भारत विरुद्ध सीरिजआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का, या स्टार खेळाडूनं घेतला ब्रेक

राजस्थान रॉयल्स संघाला आणि टी 20 वर्ल्डकपपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का, स्टार फलंदाजानं घेतला मोठा निर्णय

Updated: Jul 31, 2021, 04:09 PM IST
भारत विरुद्ध सीरिजआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का, या स्टार खेळाडूनं घेतला ब्रेक title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज आणि आयपीएलआधी सर्वात मोठी बातमी क्रिकेट विश्वातून येत आहे. स्टार फलंदाजाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून ब्रेक घेतला आहे. भारत विरुद्ध सीरिजआधी इंग्लंडचा स्टार खेळाडू खेळणार नसल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे इंग्लंड संघासमोर आता मोठं आव्हान आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं शुक्रवारी माहिती दिली आहे. 

30 वर्षांच्या बेन स्टोक्सनं अचानक एवढा मोठा निर्णय घेतल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. बेन स्टोक्स आधी दुखापतीमुळे काही महिने मैदानापासून दूर राहिला होता. त्यानंतर बेन स्टोक्स मैदानात उतरला खरा मात्र त्याने नुकत्याच केलेल्या या घोषणेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजवर आपलं नाव कोरण्यासाठी इंग्लंड संघाला बेन स्टोक्सची आवश्यकता होती. मात्र आता त्याच्याशिवाय सामना खेळण्याची वेळ आल्यानं संघासाठी हा मोठा धक्का आहे. बेन स्टोक्सच्या बोटाला जी दुखापत झाली आहे त्यातून सावरण्यासाठी त्याला आराम द्यायला हवा. त्यामुळे स्टोक्स तिन्ही फॉरमॅटमधून ब्रेक घेऊन आराम करणार आहे. 

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या सीरिजमध्ये देखील बेन स्टोक्स खेळले नव्हते. इंग्लंड क्रिकेट बोर्डनंही त्याच्या या निर्णयाला सहमती दिली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाचंही टेन्शन वाढलं आहे. याचं कारण म्हणजे बेन स्टोक्स राजस्थान संघाकडून केवळ एकच सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि इंग्लंडला परतावं लागलं. 

आयपीएलचे उर्वरित 31 सामने इंग्लंड सीरिजनंतर सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. 2019 च्या वन डे वर्ल्ड कप जिंकवून देण्यात बेन स्टोकची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळे आता भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज, आयपीएल आणि टी 20 वर्ल्ड कप या तिन्हीसाठी स्टोक्स खेळणार नसल्यानं सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे.