Ind vs Eng 2nd ODI: श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी, रोहित शर्मा फिट

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि शिखर धवन याच्यासह तो इनिंगची सुरुवात करेल. पंतच्या आगमनामुळे तो यष्टीरक्षक असेल तर केएल राहुल या सामन्यात फलंदाज म्हणून खेळेल.

Updated: Mar 26, 2021, 01:53 PM IST
Ind vs Eng 2nd ODI: श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी, रोहित शर्मा फिट title=

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि शिखर धवन याच्यासह तो इनिंगची सुरुवात करेल. पंतच्या आगमनामुळे तो यष्टीरक्षक असेल तर केएल राहुल या सामन्यात फलंदाज म्हणून खेळेल.

जोस बटलरने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय टीम आधी बॅटिंग करणार आहे.

याशिवाय भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. असे म्हटले जात होते की पहिल्या सामन्यात एकही विकेट न घेणारा कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होईल. पण तसे झाले नाही आणि दुसर्‍या वनडे सामन्यात तो देखील संघाचा भाग आहे. त्याचबरोबर, क्रुणाल पांड्या फिरकी गोलंदाजी करतानाही दिसणार आहे. 

याशिवाय वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा हे संघात आहेत. सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा वन डे सामन्यात पदार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भारतीय संघ 

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

भारताविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल करण्यात आला. संघाचा कर्णधार इयन मॉर्गन दुखापतग्रस्त झाल्यानंतर वन डे मालिकेतून तो बाहेर झाला आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी जोस बटलरच्या हाती आहे. याव्यतिरिक्त, मॉर्गनच्या जागी डेव्हिड मलानचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. सॅम बिलिंग्जची जागा लियाम लिव्हिंगस्टोनने घेतली तर मार्क वुडच्या जागी रिसी टॉप्लोने घेतले गेलं आहे.

इंग्लंडचा संघ

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुर्रान, टॉम कुरन, आदिल रशीद, रिसी टॉप्ले