Ind vs Eng: दुसऱ्या वन डे इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडिया करणार फलंदाजी

इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Updated: Mar 26, 2021, 01:28 PM IST
Ind vs Eng: दुसऱ्या वन डे इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडिया करणार फलंदाजी title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड आज दुसरा वन डे सामना पुण्यात होत आहे. दुसऱ्या सामन्यासाठी विराटची टीम सज्ज आहे.  इंग्लंड संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर फलंदाजी पहिल्यांदा भारतीय संघ करणार आहे.

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला पहिल्या वन डे सामन्यात दुखापत झाली होती. मात्र रोहित शर्मा पुन्हा खेळण्यासाठी सज्ज आहे. तर श्रेयस अय्यर वन डे सीरिजमधून आराम देण्यात आला आहे. 

टीम इंडियात कोणकोण
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा

3 सामन्यांच्या वन डे सीरिजमध्ये 66 धावांनी इंग्लंडवर मात करून पहिला सामना टीम इंडियानं जिंकला होता. दुसऱ्या वन डे सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.