India Vs Bangladesh 2nd ODI: बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाची जम्मू एक्स्प्रेस म्हणजेच उमरान मलिकचं (Umran Malik) वादळ पाहायला मिळालं आहे. उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशने अक्षरश गुडघे टेकले आहेत. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत त्याने इतका वेगाने बॉल टाकला की बॅटसमन क्लिन बोल्ड झाला होता. हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे.
उमरान मलिकने (Umran Malik) बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. त्याच्या या बॉलिंगसमोर बांगलादेशचा निभाव लागला नाही. उमरान मलिक 13 वी ओव्हर टाकायला आलेला. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये त्याने इतका वेगाने बॉल टाकला की समोरचा बॅटसमनच क्लिन बोल्ड झाला. हा बोल्ड इतका वेगाने झाला की स्टम्पच उंचावर उडाला होता.
बांगलादेशचा नजमूल शांतो (Najmul Hossain Shanto) स्ट्राईकवर होता, उमरान (Umran Malik) त्याच्या ओव्हरचा पहिलाच बॉल टाकत होता. हा बॉल त्याने 151 च्या स्पीडने टाकला होता. हा बॉल त्याने इतका वेगात टाकला की, शांतोला तो कळालाच नाही आणि वेगाने स्टम्पवर लागला. हा बॉल इतका वेगाने गेला की स्टम्पच उंचावर उडाला होता. यावेळी शांतो 21 धावा करून आऊट झाला. बांगलादेशच्या (Bangladesh) 52 धावावर 3 विकेट पडल्या होत्या.
THAT'S RAW PACE FOR YOU. FUCKING 151 KMPH. Umran Malik you beauty. pic.twitter.com/TW0X4hdagf
— ” (@Sobuujj) December 7, 2022
दरम्यान टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव गडगडला आहे. बातमी लिहेपर्यंत बांगलादेशने (Bangladesh) 6 विकेट गमावून 115 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे बांगलादेशला ऑल आऊट करण्याची संधी आहे. आता टीम इंडिया बांगलादेशला (India Vs Bangladesh) किती धावात ऑल आऊट करते हे पाहावे लागणार आहे.
बांगलादेशचा संघ- अनामुल हक, लिट्टोन दास, नजमुल होसेन शांतो, शाकिब अल हसन, मुशफिकर रहिम, महमुदुल्ला, अफिफ होस्सेन, मेहिदी हसन, इबादत होस्सेन, नसुम अहमद, मुस्ताफिजुर रहमान
भारताचा संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक