IND vs BAN Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) बांगलादेश (India vs Bangladesh) विरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. कुलदिप यादवने बांगलादेशच्या पहिल्या डावात पाच विकेट काढले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाचा पहिला कसोटी सामना जिंकण्याचा विजय निश्चित झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) उत्कृष्ट बँटींग देखील केली होती. कुलदीपने फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली. या त्याच्या महत्वपुर्ण खेळीने टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.
बांगलादेशच्या (India vs Bangladesh) पहिल्या डावात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) शानदार गोलंदाजी करत शकीब अल हसन आणि मुशफिकर रहीम सारख्या खेळाडूंना आऊट केले. तसेच नुरुल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन या सारख्या खेळाडूंचे देखील त्याने विकेट घेतले. अशाप्रकारे त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. या त्याच्या गोलंदाजीमुळे बांगलादेशचा (Bangladesh) संघ पहिल्या डावात 150 धावांवर बाद झाला आणि फॉलोऑनही वाचवू शकला नाही.
कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या संधी मिळालेल्या नाहीत. जेव्हा अतिरिक्त फिरकी गोलंदाजाची गरज असतानाच त्याला संधी मिळते. या सामन्यातही त्याचा तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव 5 वर्षात फक्त 8 कसोटी खेळला आहे. यापूर्वी कुलदीपने फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. म्हणजेच 22 महिन्यांनंतर तो कसोटी खेळायला आला आहे. आणि त्यातही तो उत्कृष्ट बॉलिंग करत आहे.
दरम्यान कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, 73 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान कुलदीप यादवने एकूण 194 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने टेस्टमध्ये तीनदा 5 विकेट काढल्या आहेत.त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.