Suryakumar Yadav : रोहितने दिला सुर्याला नारळ... आता 'या' मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार

सूर्याला बांगलादेशाच्या (Bangladesh ODI) सिरीजमध्ये टीममधून वगळण्यात आलं. अशातच आता एक मोठी बातमी समोर आलीये, ती म्हणजे सूर्या आता दुसऱ्या एका टीमसोबत खेळताना दिसणार आहे.

Updated: Dec 4, 2022, 05:14 PM IST
Suryakumar Yadav : रोहितने दिला सुर्याला नारळ... आता 'या' मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार title=

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा (Team India) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) उत्तम फलंदाजी करत स्वतःच नाणं खणखणीत बजावलं आहे. त्याने त्यात्या तुफान फलंदाजीने चाहत्यांचं मन जिंकून टीममध्येही स्वतःची जागा तयार केली आहे. सूर्याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 56 बॉल्समध्ये 111 रन्सची खेळी केली होती. त्यानंतरही सूर्याला बांगलादेशाच्या (Bangladesh ODI) सिरीजमध्ये टीममधून वगळण्यात आलं. अशातच आता एक मोठी बातमी समोर आलीये, ती म्हणजे सूर्या आता दुसऱ्या एका टीमसोबत खेळताना दिसणार आहे.

Suryakumar Yadav आता या टीमकडून खेळणार

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी-20 सामन्यात डेब्यू केलं होतं. यावेळी त्याने फार कमी वेळातच तुफान फलंदाजी करत टीममध्ये स्थान निर्माण केलं. यासोबतच त्याने टी-20 मध्ये पाकिस्तानची ओपनर जोडी बाबर-रिझवान यांना मागे टाकत नंबर 1 क्रमांकही पटकावला.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव आता रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy 2022-23) च्या सीझनमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. 27 डिसेंबर रोजी सौराष्ट्र विरूद्ध पहिला सामना खेळला जाणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सुर्यकुमारचा जलवा पहायला मिळू शकतो.

13 डिसेंबर पासून सुरु होतेय रणजी ट्रॉफी

बीसीसीआयकडून दरवर्षी रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात येतं. ज्यामध्ये तरूण खेळाडू त्यांच्या उत्तम खेळाचं प्रदर्शन करतात. रणजी ट्रॉफी 2022-23 चा सिझन 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ज्याचा अंतिम सामना 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी यांच्यामध्ये रंगणार आहे. अशामध्ये सर्वांचं लक्ष Suryakumar Yadav च्या खेळावर असणार आहे.