दुसऱ्या T20 सामन्यापुर्वी शिखर धवनच ट्विट, सोशल मीडियावर एकचं खळबळ

'सर्व क्रिकेटपटू पैसे कमावण्याचे मागे आहेत, पण तू...', सोशल मीडियावर असं का म्हणतायत शिखर धवनला? जाणून घ्या

Updated: Sep 23, 2022, 06:27 PM IST
  दुसऱ्या T20 सामन्यापुर्वी शिखर धवनच ट्विट, सोशल मीडियावर एकचं खळबळ title=

मुंबई : देशात सध्या लम्पी आजाराने (lumpy skin disease) थैमान घातले आहे. या आजाराला अनेक राज्यातील गायी आणि म्हशी बळी पडत आहेत. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. याच आजारावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सरकारला आवाहन करत आहेत. त्यात आता टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) सुद्घा या देशातल्या प्रमुख मुद्यावर भाष्य केलंय.तो या मुद्यावर काय म्हणालाय, ते जाणून घेऊयात. 

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात गायी आणि म्हशींना लम्पी आजार झाल्याची घटना समोर आली आहे. या आजारामुळे अनेक गायींचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हा आजार मोठी समस्या बनत चालला आहे. याच विषयावर आता शिखर धवनने (Shikhar Dhawan) ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला शिखर धवन?
शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या ट्विटमध्ये म्हणतोय, संबंधीत प्रशासनाने लम्पी आजाराविरूद्ध लढून गायींचे प्राण वाचवावे, असे आवाहन त्याने केले आहे. मोठ्या संख्येने प्राणी या आजाराने बाधित होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे तो म्हणतोय. एकूणच त्याने हे ट्विट करून लम्पी सारख्या (lumpy skin disease) आजाराला गांभीर्याने घेत मोठा सवाल उपस्थित केला आहे. 

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने ट्विटमध्ये लिहले की, सोनु सुदनंतर आणखीण एक सेलिब्रिटी आला, ज्याने या विषयावर भाष्य केलंय, असे त्याने म्हटलेय.दुसरा युझर म्हणतोय,  'सर्व क्रिकेटपटू पैसे कमावण्याचे मागे आहेत, पण तू महान आहेस. अशा मुद्याला समोर आणून सर्वसामान्यांच्या मदतीला उतरतोय, असे त्याने म्हटलेय. सोशल मीडियावर धवनच्या या ट्विटची खुप चर्चा आहे. अनेक युझर्स शिखरनेने उचलेल्या प्रश्नावरून त्याचे कौतूक करत आहेत.