मुंबई : भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. पराभवासह स्लो ओव्हर रेटचा ही फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. आयसीसीने यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला दंड ठोठावला आहे. पराभवानंतरचा दंड हा कांगारू संघासाठी दुहेरी धक्का होता. आयसीसीने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला यासाठी सामना शुल्काच्या 40 टक्के दंड ठोठावला आहे. या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या कांगारू संघाचे चार गुण वजा झाले आहेत.
टीम इंडियाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात प्रथमच कांगारू संघाचा पराभव केला. या विजयात रहाणेच्या शतकाचे मोलाचे योगदान होते. या सामन्यात कांगारू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर त्यांचा संघ पहिल्या डावात १९५ रन करु शकला.
रहाणेच्या शतकीय खेळीच्या प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 195 धावांच्या उत्तरात 326 धावा केल्या. पहिल्या डावात भारताला १३१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात कांगारूंची फलंदाजी पुन्हा भारतीय गोलंदाजीसमोर कोसळली आणि २०० धावांवर बाद झाली. यानंतर भारताला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने दोन विकेट गमावून साध्य केले आणि आठ गडी राखून सामना जिंकला.