Hardik Pandya: रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन....; हार्दिकने रोहितवर साधला निशाणा

Hardik Pandya: कोणीतरी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर टीका करतायत. येत्या सिझनमध्ये कर्णधार हार्दिक पांड्यालाही ( Hardik Pandya ) तसा पाठिंबा मिळत नाहीये. अशाच परिस्थितीत हार्दिक पंड्याचा एक डायलॉग 'रिश्ते में तो हम तुम्हारे कप्तान लगते हैं' हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 4, 2024, 05:24 PM IST
Hardik Pandya: रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन....; हार्दिकने रोहितवर साधला निशाणा title=

Hardik Pandya: गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आणि हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. यावेळी रोहित शर्माला बाजूला सारल्याने चाहते मात्र संतापले होते. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) हा यापूर्वी मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र गुजरात टायटन्सने दोन सिझनमध्ये होता. आता पुन्हा मुंबईत परतल्यावर हार्दिंकला कर्णधारपद मिळालं. 

कोणीतरी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर टीका करतायत. येत्या सिझनमध्ये कर्णधार हार्दिक पांड्यालाही ( Hardik Pandya ) तसा पाठिंबा मिळत नाहीये. अशाच परिस्थितीत हार्दिक पंड्याचा एक डायलॉग 'रिश्ते में तो हम तुम्हारे कप्तान लगते हैं' हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दरम्यान यावेळी चाहत्यांनी याचा संदर्भ रोहित शर्माची जोडला. मात्र यामागील सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. 

हार्दिक पांड्या स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये गेला होता. यावेळी अँकर त्याला आणि त्याच्या चाहत्यांना काही प्रश्न विचारत होता. शो सुरु असताना एका अँकरने चाहत्याला विचारलं की, हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya ) वाढदिवस कोणत्या दिवशी आहे? त्यावेळी एका महिला चाहत्याने सांगितले की, हार्दिकचा वाढदिवस 11 ऑक्टोबरला येतो. अशातच कोणाच्या तरी लक्षात आले की, त्या दिवशी बॉलीवूडचे अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की, जर तुम्ही तुमचा वाढदिवस त्यांच्यासोबत शेअर करत असाल तर त्यांच्या एक डायलॉग झाला पाहिजे. 

यावेळी हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) म्हणाला की, "रिश्ते में हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है पांड्या" हा संवाद पूर्ण करण्यात अँकरने त्याला मदत केली. कारण त्याला 'बाप' म्हणायचं नव्हतं. यामुळेच अँकरने फादरऐवजी कॅप्टन हा शब्द वापरला.

हार्दिकचा डायलॉग सोशल मीडियावर होतोय व्हायरल

दरम्यान हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya ) हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र हा डायलॉग ऐकल्यानंतर रोहित शर्माचे चाहते संतापले. हा काही सेकंदांचा संवाद असला तरी हा व्हिडीओ पाहिल्यास हार्दिक पांड्याला हे वाक्य रोहित शर्माला उद्देशून म्हणायचं नव्हतं हे लक्षात येईल. 

हार्दिक पांड्याने यावेळी सांगितले की, तो 2017 किंवा 2019 च्या आयपीएलच्या फायनलनंतर अमिताभ बच्चनला भेटला होता. अमिताभ जेव्हा त्यांच्या वडिलांना भेटले तेव्हा बिग बींनी त्यांचे कौतुक केलं.