PAK vs IND : ना तुला ना मला... रिझवानने दिला पाकिस्तानला धोका, असं काही केलं की... पाहा Video

India vs Pakistan Viral Video : बाबर आझमने नसीम शाहकडे आठव्या ओव्हरची जबाबदारी दिली होती. त्यावेळी नसीमने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर शुभमनला गोंधळात टाकलं. शुभमन गिलने (Shubman Gill) तो बॉल ऑफ साइडमधून खेळण्याचा प्रयत्न केला, पण...

Updated: Sep 10, 2023, 07:23 PM IST
PAK vs IND : ना तुला ना मला... रिझवानने दिला पाकिस्तानला धोका, असं काही केलं की... पाहा Video title=
Iftikhar Ahmed drop Catch PAK vs IND, Asia Cup 2023

Iftikhar Ahmed drop Shubman Gill Catch : पाकिस्तानची फिल्डिंग म्हणजे हास्यास्पद विषय... पाकिस्तानच्या फिल्डिंगचे (Pakistan Fielding Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याचा प्रतत्य देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2023 च्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानकडून खराब क्षेत्ररक्षण दिसलं. या सामन्याच्या आठव्या ओव्हरवेळी पाकिस्तानच्या स्लीपला थांबलेल्या खेळाडूंनी मोठी चूक केली. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) मोठा फायदा झाल्याचं दिसून आलंय. नेमकं काय झालं? पाहूया...

बाबर आझमने नसीम शाहकडे आठव्या ओव्हरची जबाबदारी दिली होती. त्यावेळी नसीमने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर शुभमनला गोंधळात टाकलं. शुभमन गिलने (Shubman Gill) तो बॉल ऑफ साइडमधून खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेने उडून गेला. मात्र, त्यावेळी विकेटकिपर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) एक चूक केली. रिझवानने कॅच घेणार असं दर्शवलं अन् अखेरच्या क्षणी निर्णय बदलला. त्यावेळी स्लीपला थांबलेल्या उफ्तिकार अहमदने (Iftikhar Ahmed) कॅच सोडला. दोन्ही स्लीप फिल्डरच्या मधून बॉल थेट बॉन्ड्रीच्या दिशेने गेला आणि भारताला चार धावा मिळाल्या. शुभमनच्या बॅटला कट लागल्याने कॅच झाला असता तर शुभमन तंबुत परतला असता. मात्र, तसं झाल्याचं पहायला मिळालं नाही. 

पाहा Video

आणखी वाचा - सेकंदात सुरू झाला धो धो पाऊस अन् 'तो' मदतीला धावला; पाकिस्तानच्या प्लेयरने जिंकलं मन; पाहा Video

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.