Julan Goswami | झूलनची ऐतिहासिक कामगिरी, विश्व विक्रमाला गवसणी

महिला टीम इंडियाच्या (Womens Team India) झूलन गोस्वामीने (Julan Goswami) आपल्या अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) इतिहास रचला आहे.   

Updated: Mar 12, 2022, 05:02 PM IST
Julan Goswami | झूलनची ऐतिहासिक कामगिरी, विश्व विक्रमाला गवसणी title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : महिला टीम इंडियाच्या (Womens Team India) झूलन गोस्वामीने (Julan Goswami) आपल्या अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) इतिहास रचला आहे. झूलनने वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा कारनामा केला आहे. झूलन वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. (icc wwc 2022 wiw vs iw womens team india jhulan goswami take anisa mohammed wicket and break lyn fullston most wickets record in world cup) 

झूलनने विंडिज विरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली. तिने विंडिजच्या अनिसा मोहम्मदला (Anisa Mohammed) आऊट केलं. यासह झूलनने ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज लिन फुलस्टोनला (Lyn Fullston) पछाडत रेकॉर्ड ब्रेक केलाय. झूलनची वर्ल्ड कपमधील ही एकूण 40 वी विकेट ठरली.

झूलनने 31 सामन्यांमध्ये हा कारनामा केलाय. तर लिनने अवघ्या 20 सामन्यात 40 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. 

सामन्याचा धावता आढावा

ओपनर स्म्रिती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोघांच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिलं.

टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर विंडिजचा 40.3 ओव्हरमध्ये 162 धावांवर बाजार उठला. टीम इंडियाने यासह 155 धावांनी विंडिजचा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. टीम इंडिया आता पुढील सामना इंग्लंड विरुद्ध 16 मार्चला खेळणार आहे.