World Cup 2023 : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोणाचं पारडं जड? पाहा रेकॉर्ड काय सांगतो

IND vs AUS ODI Records: यजमान भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्याला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमीमध्ये या सामन्याची जबरदस्त उत्सुकता आहे. जाणून घेऊया या दोनही संघांची एकदिवसी क्रिकेटमधली कामगिरी

राजीव कासले | Updated: Oct 7, 2023, 05:58 PM IST
World Cup 2023 : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोणाचं पारडं जड? पाहा रेकॉर्ड काय सांगतो title=

ICC Cricket World Cup 2023: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia) होणार आहे. या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा संघही तितकाच तयारीनिशी या स्पर्धेत उतरला आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे नक्की. स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका भारताने दोन-एक अशी जिंकली होती. त्यामुळे टीम इंडियाला नक्कीच फायदा होणार आहे. 

भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट इतिहास फार जुना आहे. दोनही संघांमध्ये 1980 पासून 2023 पासून तब्बल 149 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. आकडेवारी पाहिली तर ऑस्ट्रेशलियाचं पारडं जड आहे. 149 सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने तब्बल 83 सामने जिंकले आहेत. तर भारताला आतापर्यंत केवळ 56 सामन्यात विजय मिळवता आला आहे. दहा सामन्यांचा निकाल लागला नाही. विशेष म्हणजे या भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकही सामना टाय झालेला नाही. 

भारतात या या दोनही संघात आतापर्यंत 70 सामने खेळवण्यात आले आहेत. यात 32 सामने भारताने तर 33 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. तर ऑस्ट्रेलियामध्ये दो दन संघात एकुण 54 सामने खेळले गेलेत. यात तब्बल 38 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर केवळ 14 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय. 2 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. त्रयस्थ ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 25 वेळा आमने सामन आलेत. यात 10 सामन्यात भारत तर 12 सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकलीय. 

विश्चचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आतापर्यंत 12 सामने खेळवण्यात आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 8 सामने जिंकलेत. तर भारताने केवळ चार सामन्यात विजय मिळवलाय. चेन्नईच्या चिदम्बरम मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेल्या तीन सामन्यात भारताच्या बाजूने 1 तर ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दोन सामन्यांचा निकाल लागला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंतच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या कामगिरीवर लक्ष टाकलं तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. पण हे चित्र बदलवण्यासाठी रोहितसेना सज्ज झालीय. 

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
डेविड वार्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, सेन एबॉट, एडम झम्पा