AFG vs BAN : बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय

Cricket World Cup 2023 : बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने वर्ल्ड कपची (World Cup 2023) सुरूवात विजयासह केली आहे.  

Updated: Oct 7, 2023, 04:24 PM IST
AFG vs BAN : बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय  title=
AFG vs BAN

Bangladesh vs Afghanistan : वर्ल्ड कप 2023 मधील तिसरा सामना बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (AFG vs BAN) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बांग्लादेशने अफगाणिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी बांगलादेशसमोर गुडघे टेकवले. अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 156 धावा करता आल्या. 37 ओव्हरमध्येच अफगाणिस्तानची टीम तंबुत परतली. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने वर्ल्ड कपची (World Cup 2023) सुरूवात विजयासह केली आहे.

कर्णधार शाकिब अल हसन याने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या 8 ओव्हर खेळून काढल्या. कॅप्टन शाकिबने बांगलादेशला पहिली विकेट मिळवून दिली. 24 व्या सामन्यापर्यंत बांगलादेशच्या 110 धावा पूर्ण झाल्या होत्या. 112 वर 2 अशी परिस्थिती बांगलादेशची होती. त्यावरून 156 वर 10 अशी अवस्था अफगाणिस्तानची झाली अन् अफगाणी फलंदाजांनी बांगलादेशने गुडघे टेकवले. 

अफगाणिस्तानने दिलेलं 157 धावांचं आव्हान पार करताना बांगलादेशने सावध सुरूवात केली. मात्र, तनझिद हसन धाव घेण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर लिटल दास देखील लवकर बाद झाला त्यामुळे सामना टफ होईल, अशी शक्यता असताना नजमुल हुसेन शांतो आणि मेहदी हसन मिराझ यांनी मैदानात पाय रोवून ठेवले अन् बांगलादेशने आरामात सामना खिशात घातला.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराझ, शकीब अल हसन (C), मुशफिकुर रहीम (W), तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.