महिला वर्ल्ड कप, पाइंट्स टेबल, भारताला किती गुण जाणून घ्या...

 महिला वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत आला आहे.  आतापर्यंत सहा संघाचे पाच सामने झाले असून दोन संघाचे सात सामने झाले आहेत. त्यामुळे आता पाइंट्स टेबल रंगतदार स्थिती आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2017, 07:40 PM IST
 महिला वर्ल्ड कप, पाइंट्स टेबल, भारताला किती गुण जाणून घ्या...  title=
सौजन्य क्रिकबझ

ब्रिस्टॉल :  महिला वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत आला आहे.  आतापर्यंत सहा संघाचे पाच सामने झाले असून दोन संघाचे सात सामने झाले आहेत. त्यामुळे आता पाइंट्स टेबल रंगतदार स्थिती आहे.

यात इंग्लड, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी पाच सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय तर एकात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या तिघांचे ८ गुण आहेत. 

तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना रद्द झाल्याने त्यांना प्रत्येकी एक अंक दिला आहे. त्यांनी पाच पैकी ३ सामने जिंकले आहे. त्यामुळे त्यांचे गुण प्रत्येकी सात झाले आहेत. 

वेस्ट इंडिज श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.  वेस्ट इंडिजने ४, श्रीलंकेने ५ आणि पाकिस्तानने ६ सामने गमावले आहेत.