भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान...

 भारताच्या पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावाचे आव्हान ठेवले आहे.  भारताचा हा सहावा सामना असून त्यातील चार सामने जिंकले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2017, 07:04 PM IST
 भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान... title=

ब्रिस्टॉल :  भारताच्या पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावाचे आव्हान ठेवले आहे.  भारताचा हा सहावा सामना असून त्यातील चार सामने जिंकले आहे. 

भारताने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे.  ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजी आमंत्रण दिले. भारताने सुरूवातील स्मृती मनधानाची विकेट गमावल्यानंतर सावध फलंदाजी केली.  पूनम राऊत आणि मिथाली राज यांनी १५७ धावांची भागीदारी करत भारताला आश्वासक धावसंख्येकडे नेले.  पूनम राऊत याने आपल्या कारर्किदीतील आणि वर्ल्ड कपमधील पहिले शतक झळकावले. तीने १३६ चेंडूत ११ चौकारांसह १०६ धावा केल्या. तिची ही सर्वोत्तम धावा संख्या आहे. तर  मिथाली राजने  ११४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारसह ६९ धावा काढल्या. 

ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्टट आणि पेरी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर गार्नर आणि बिम यांनी प्रत्येकी एक खेळाडूला तंबूत पाठविले.