मुंबई : भारत -न्यूझिलंडच्या तिसर्या टी-२० मॅचकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले होते.
टी२० सीरिजमधील हा अंतिम सामना जिंकल्याने भारत न्यूझिलंड विरूद्ध सीरीज जिंकणार होती. पण त्यासोबतच आयसीसी मधील टीमचं रॅकिंगदेखील बदलणार होते.
आयसीसी रॅंकिंगमध्ये न्यूझिलंड अव्वल स्थानी होते. त्यापाठोपाठ पाकिस्तान संघांचा क्रमांक होता. दोन्ही संघ १२४ हा गुणसंख्येवर होत्या. मात्र काही पॉईंट्सच्या फरकाने न्यूझिलंड पुढे होती. पण भारताविरूद्ध मॅच हरल्याने न्यूझिलंडचं रॅकिंग घसरले अअहे. ते दुसर्याक्रमांकावर आणि पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर पोहचले आहे. भारत या रॅकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
भारत -न्यूझिलंड हा टी २० सामना चुरशीचा हिता. पावसाच्या व्यत्ययामुळे तो २० ऐवजी ६ ओव्हरचा खेळण्यात आला. यामध्ये भारताने न्यूझिलंडवर ६ धावांनी मात केली. पहिल्यांदाच भारताने न्यूझिलंडवर मात करून टी २० सिरीज जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाप्रमाणेच खेळाडूंचाही उत्साह द्विगुणित झाला आहे.