ICC Test Ranking टीम इंडियाचा बोलबाला! दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोण?

आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा बोलबाला आहे. आयसीसीने अपडेट्स जारी केले आहेत.

Updated: May 13, 2021, 01:52 PM IST
ICC Test Ranking टीम इंडियाचा बोलबाला! दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोण? title=

मुंबई: आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा बोलबाला आहे. आयसीसीने अपडेट्स जारी केले आहेत. त्यानुसार टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 

121 पॉइंट मिळवत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणारा संघ न्यूझीलंड 120 अंकांनी दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंड संघ आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथॅम्प्टन येथे 18 ते 22 जून दरम्यान प्रथम विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 आणि इंग्लंडला 3-1 असं पराभूत केलं. याव्यतिरिक्त न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला २-०ने पराभूत केले. 

इंग्लंड 109 अंकांनी तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 108 अंकांनी चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 94 अंकांनी पाचव्या स्थानावर आहे. वेस्टइंडिज सहाव्या स्थानावर आहे. झिम्बाब्बे सर्वात शेवटच्या 10 व्या स्थानावर आहे.