मुंबई: टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं टीम इंडियावर गंभीर आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गाबा स्टेडियमवर टीम इंडियाने 2-1ने ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यानंतर ती जखम कायम राहिली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने संन्यास घेण्याचे संकेत देत असताना टीम इंडियावर निशाणा साधला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने टीम इंडियावर आरोप केला. त्यानंतर सोशल मीडियावर पेनवर टीका देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. टीम इंडियाच्या जाळ्यात आम्ही फसलो असा आरोप पेननं केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर अजब तर्क काढत टीम इंडियावर देखील निशाणा साधला.
गाबा स्टेडियमवर टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. 'टीम इंडियाकडे खेळाडूंचं लक्ष विचलित करण्याचं कसब आहे. आम्ही त्यांच्या जाळ्यात फसलो. त्यामुळे आमचा फोकस शिफ्ट झाला. '
'टीम इंडिया विरुद्ध खेळण्याचे एक आव्हान म्हणजे ते खेळाडू तुम्हाल खूप स्लेज करतात. खेळाडू आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत राहतात. सीरिजदरम्यान असे काही प्रसंग घडत गेले आणि त्यांच्या जाळ्यात आम्ही फसलो.'
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेननं संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याच्या पश्चात संघाच्या कर्णधारपदाचं नेतृत्व स्टीव स्मिथच्या खांद्यावर जाऊ शकतं. टीम इंडिया विरुद्ध झालेल्या सीरिजनंतर पेनवर खूप जास्त दबाव वाढला होता. त्याला कर्णधारपदावरून काढण्यासाठी हा दबाव होता.