NZ vs AFG | न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाचा बाजार उठला

न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.  

Updated: Nov 7, 2021, 06:39 PM IST
NZ vs AFG | न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाचा बाजार उठला  title=

अबूधाबी | न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमन्सनने सर्वाधिक नाबाद 40 धावांची खेळी केली. तर डेव्होन कॉनव्हेनेही 36 नाबाद धावा केल्या. सलामवीर मार्टीन गुप्टीलने 28 रन्स केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (icc t 20 world cup 2021 new Zealand  beat Afghanistan by 8 wickets at abu dhabi)

टीम इंडियाच्या सेमी फायनलमधील आव्हान हे या सामन्याच्या निकालावर आधारित होतं. टीम इंडियाच्या सेमीफायनलसाठी अफगाणिस्तानचा या सामन्यात विजय महत्त्वाचा होता. मात्र आता न्यूझीलंडने विजय मिळवल्याने टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांना अफगाणिस्तानकडून अपेक्षा होत्या. मात्र अखेरीस आता टीम इंडियाचा बाजार उठला आहे.  

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल, डेरील मिचेल, केन विलियम्सन, डेवन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, टीम साउथी, ईश सोढी आणि ट्रेंट बोल्ट. 

अफगाणिस्तान : हजरातुल्लाह जझई, मोहम्मद शहजाद, रहमानुल्लाह गुरबाज, नाजीबुल्लाह जादरान, गुलबदैन नईब, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान, नवीन उल हक, हामिद हसन आणि मुजीब उर रहमान.