कोहलीने T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर ICC ने असा केला त्याचा सन्मान, भारतीय फॅन्स विसरु शकणार नाही

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

Updated: Nov 9, 2021, 02:29 PM IST
कोहलीने T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर ICC ने असा केला त्याचा सन्मान, भारतीय फॅन्स विसरु शकणार नाही title=

दुबई : टीम इंडियाचा T20 world cup 2021 मधील प्रवास उपांत्य फेरीपूर्वी संपला. सोमवारी, भारताचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध होता, ज्यामध्ये भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना विराट कोहलीच्या T20 कर्णधारपदातील शेवटचा सामना होता. विराट कोहलीने T-20 फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद सोडले आहे. विराट कोहलीने T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ही क्रिकेटची सर्वात मोठी संस्था देखील भावूक झाली. सोशल मीडियावर आयसीसीने विराट कोहलीसाठी असे काम केले, जे कोणीही भारतीय चाहते विसरणार नाही. (Virat Kohli to step down as T20I captain)

वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या ट्विटर अकाऊंटच्या कव्हर पेजवर विराट कोहलीचा T20 कर्णधार म्हणून शेवटच्या सामन्याचा फोटो टाकला आहे. आयसीसीने विराट कोहलीला आदर देण्यासाठी हे केले आहे, जे पाहून भारतीय चाहत्यांनाही अभिमान वाटेल. विराट कोहली (Virat Kohli) याने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

विराट कोहलीने आपल्यानंतर टीम इंडियाचे T20 कर्णधारपद कोणाला मिळणार याचा खुलासा केला आहे. विराट कोहलीने या पदासाठी रोहितच्या नावाचे संकेत दिले आहेत. विराट म्हणाला, 'संघ ज्या प्रकारे खेळला त्याचा मला खूप अभिमान आहे. आता या संघाला पुढे नेण्याची जबाबदारी इतरांवर देण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. साहजिकच रोहित इथे आहे आणि तो काही काळापासून गोष्टींचा शोध घेत आहे. विराटने ज्या पद्धतीने रोहितचे नाव घेतले, त्यावरून आता रोहित या संघाचा नवा कर्णधार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने स्वत: आणि टीम इंडियाबद्दल जाहीरपणे अनेक खुलासे केले. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली म्हणाला, 'माझ्यासाठी (संघाचे नेतृत्व करणे) हा सन्मान आहे, मला संधी देण्यात आली आणि मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 6 ते 7 वर्षात मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरलो तेव्हा मी चांगलं क्रिकेट खेळलो, ज्याचा शरीरावर खूप परिणाम होतो.

कोहलीचे वनडे कर्णधारपदही धोक्यात

कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 क्रिकेटमध्ये 50 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 30 जिंकले आहेत आणि 16 गमावले आहेत. कर्णधार म्हणून विराट कोहली टीम इंडियासाठी एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही, त्यानंतर त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडावे लागले. टी-20चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीचे वनडे कर्णधारपदही धोक्यात येणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी-20 चे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.