दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने अर्थात आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरवर साडे तीन वर्षांची बंदी टाकली आहे. आयसीसीने भ्रष्टाचाराच्या आरोपात ही कारवाई केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीनुसार, ब्रेंडनने आपली चूक मान्य केली आहे. तसेच कोणत्या सुनावणीशिवाय जी शिक्षा मिळेल तो भोगण्यास तयार आहे. (icc baned to brendan taylor for 3 year and 6 months all from cricket anti corruption code and anti doping code)
आयसीसीने टेलरला ही शिक्षा भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दिली आहे. एका भारतीय बुकीकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याप्रकरणी टेलर दोषी ठरला होता. खुद्द टेलरनेच काही दिवसांपूर्वी हा खुलासा केला होता.
टेलरने मात्र आपण कधीही फिक्सिंग केले नसल्याचे स्पष्ट करत आयसीसीला माहिती दिली. टेलरने कबूल केलं की त्याने आंतरराष्ट्रीय संस्थेला थोड्या उशिराने माहिती दिली. कारण त्याला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भिती होती. याशिवाय डोपिंगच्या एका वेगळ्या प्रकरणातही टेलरवर एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे.
The ICC has released a statement on Brendan Taylor.https://t.co/IYKHAVeZHa
— ICC (@ICC) January 28, 2022