IPL 2022 | विराटनंतर RCB ची कॅप्टन्सी कोणाकडे? या तुफानी ऑलराऊंडरचं नाव चर्चेत

IPL 2022- 10 पैकी 8 संघांचे कर्णधार ठरले? विराटनंतर RCB ची  कोण सांभाळणार कमान?

Updated: Jan 28, 2022, 06:01 PM IST
IPL 2022 | विराटनंतर RCB ची कॅप्टन्सी कोणाकडे? या तुफानी ऑलराऊंडरचं नाव चर्चेत title=

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये आयपीएलच्या सामन्यांमध्ये 10 संघ खेळणार आहेत. यासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. यावेळी लखनऊ आणि अहमदाबाद अशा दोन टीम नव्या 

चेन्नई सुपरकिंग्स- चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच आहे. तो ठरलेला आहे. CSK संघ आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात झाल्यापासून धोनी या संघाचं कर्णधारपद सांभाळत आहे. 2022 मध्ये देखील महेंद्रसिंह धोनीच कर्णधार असणार आहे. चेन्नई संघाने 4 वेळा ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला आहे.

मुंबई इंडिन्स- वन डे आणि टी 20 क्रिकेटसोबत रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद आहे. यंदाही कर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे. मुंबई संघाने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल या तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. 2021 मध्ये संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळलं होतं. आता पुन्हा एकदा तो संघाची धुरा सांभाळताना दिसू शकतो. संजू सॅमसन तरुण आहे आणि टीमने त्याच्यासाठी गुंतवणूक केली आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर यावेळीही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

पंजाब किंग्स- दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना रिटेन केलं आहे. के एल राहुलने गेल्या हंगामात कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. आता राहुलला रिलीज करण्यात आलं आहे. मयंक अग्रवालला पंजाब किंग्जचा कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

कोलकाता संघ - केकेआरने आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांना कायम ठेवले. फ्रँचायझीने कर्णधाराबाबत आपले पत्ते उघडलेले नाहीत. इऑन मॉर्गन केकेआरचा कर्णधार होता. आता केकेआर ही जबाबदारी कोणाकडे सोपवते हे पाहावे लागेल.

अहमदाबाद- आयपीएलमध्ये नव्याने हा संघ समाविष्ट झाला आहे. या संघाने आपले तीन खेळाडू निवडले आहेत. हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि राशिद खान अशी त्यांची नावं आहेत. हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

लखनऊ सुपरजॉयन्ट्स- आयपीएलचामध्ये आणखी एक नवा संघ समाविष्ट झाला आहे. फ्रँचायझीने केएल राहुल, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉइनिस यांना आपल्या संघात घेतलं आहे. राहुलला 17 कोटींमध्ये खरेदी करण्यात आलं असून यासोबतच तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. 

राहुल लखनऊ संघाची कमान सांभाळण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले आहे. राहुलकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.

सनराइजर्स हैदराबाद- केन विलियमसन, अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना संघानं रिटेन केलं आहे. कोलकाता संघाकडे आता केन विलियमसनकडे हैदराबाद संघाची धुरा सांभळण्यासाठी दिली जाण्याची शक्यता आहे. 

दिल्ली कॅपिटल्स- दिल्लीने श्रेयस अय्यरकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर रिषभ पंतने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. आता यंदाही रिषभ पंत कर्णधारपदाची कमान संभाळणार आहे. 

बंगळुरू- या आयपीएलमध्ये आरसीबी नव्या कर्णधारासोबत खेळणार आहे. विराट कोहली गेल्या अनेक सत्रांपासून संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. IPL-2021 नंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवले आहे. त्यामुळे संघ ग्लेन मॅक्सवेलकडे कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.