Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक सुरु असून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्याकडून संपूर्ण भारतीयांना पदकाची अपेक्षा होती. मात्र क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्य सेनचा पराभव झाला. यानंतर कांस्य पदकाच्या सामन्यातही त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पदकाची अपेक्षा केली असताना हाती काहीही न लागल्याने लक्ष्य सेन फार निराश झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या पराभवानंतर लक्ष्य सेनने विरोधी खेळाडूच्या शॉर्ट्सना उत्तर देणं कठीण असल्याचं म्हटलं आहे.
कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर मलेशियाच्या खेळाडूने जोरदार कमबॅक करत 11-8 ने आघाडी घेतल्यानंतर दुसरा गेम 21-16 असा जिंकला. यानंतर ली जियाने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये पूर्णपणे वर्चस्व राखलं आणि 21-11 असा विजय मिळवला. सामन्यासोबतच त्याने कांस्यपदकही पटकावलं. दरम्यान या पराभवामुळे बॅडमिंटनच्या खेळाकडून असलेल्या पदकाच्या अपेक्षांचाही भंग झाला.
कांस्य पदकासाठी भारत विरूद्ध मलेशिया यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर लक्ष्य म्हणाला की, मलेशियाच्या खेळाडूच्या शॉट्सला प्रत्युत्तर देणं काहीसं कठीण होते. मी या सामन्याची सुरुवात चांगली केली पण मला आघाडी कायम ठेवता आली नाही. नंतर जेव्हा त्याने चांगला खेळ करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या शॉर्ट्सना उत्तरं शोधणं माझ्यासाठी कठीण झाले. एकूणच, निकालामुळे थोडी निराशा झाली आहे.
लक्ष्यचा हा सलग दुसरा सामना होता की, तो अधिक चांगल्या स्थितीत असूनही सामना हरला. रविवारीही लक्ष्यने पहिल्या गेममध्ये तीन गेम पॉइंट गमावले आणि नंतर दुसऱ्या गेममध्ये व्हिक्टर एक्सेलसेनविरुद्ध 7-0 अशी आघाडी गमावल्यानंतर सेनने सामना गमावला. ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू होण्याचं त्याच्यासमोर आव्हान होतं. मात्र पराभव झाल्याने लक्ष्य सह संपूर्ण भारतीयांचं स्वप्न भंगलं आहे.
लक्ष्य पुढे म्हणाला की, "मला समजत नाहीये दोन्ही पराभवांची तुलना कशी करावी. दोन्ही सामने खरोखर महत्त्वाचं होते. अशा वेळी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असायला हवे. याचे श्रेय समोरच्या खेळाडूला जातं, त्याने चांगल्या पद्धतीने खेळ केला.