Vinesh phogat Into the Semis : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला कुस्ती 50 किलो स्पर्धेत जागतिक विजेती आणि गतविजेती युई सुसाकीचा पराभव करून अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली होती. गोल्ड मेडलिस्टचा पराभव करून विनेश फोगाटने क्वाटर फायनलमध्ये एन्ट्री मारली होती. त्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटर फायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. विनेश फोगटने दमदार कामगिरी केल्याने आता भारताच्या अपेक्षा अजूनही वाढल्या आहेत.
THE CELEBRATIONS FROM VINESH PHOGAT.
- What a day for India. pic.twitter.com/blWZolxY6g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 6, 2024
विनेश फोगटने महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा पराभव करत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. ओक्सानाने शेवटच्या क्षणी विनेशवर दबाव आणला पण विनेश फोगटने तिला भारताची रग दाखवली अन् सामना आपल्या खिशात घातला. पहिल्या डावात विनेशने 2-0 ने लीड घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात विनेशने पहिल्या 2 सेकंदातच दोन पाईट्स घेतले अन् सामन्यावर कब्जा केला. सामना 4-0 ने पुढे असताना ओक्सानाने 2 पाईंट्स घेतले. त्यानंतर विनेशने आणखी 2 गुण घेतले अन् 6-2 ची लीड मिळवली. अखेरीस ओक्सानाने हातपाय चालवले अन् 5 गुण घेतले, तोपर्यंत विनेशने 7 गुण घेतले होते.
त्याआधी, विनेश फोगाट जपानच्या युई सुसाकीला पराभूत करणारी जगातील पहिली कुस्तीपटू ठरली. अगदी शेवटच्या क्षणी विजयाचा दावा करण्यासाठी विनेश फोगाटने खेळलेली खेळी भारताच्या बाजूची ठरली. युई सुसाकीने पहिल्या डावात 2-0 ने आघाडी घेतली होती. अखेरच्या 1 मिनीटापर्यंत स्कोर 2-0 राहिला. पण अखेरच्या मिनिटात विनेश फोगाटने डाव टाकला अन् सामना 3-2 असा विनेशच्या बाजूने झुकला. सामना जिंकल्यावर विनेशला डोळ्यात पाणी आलं. तिला अश्रू आवरता आले नाहीत.
दरम्यान, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकनंतर विनेशवर बंदी घालण्यात आली होती. बृजभूषण शरण सिंह यांनी विनेशला टार्गेट करत 'आम्ही खोटा सिक्का पाठवला होता', अशी टीका केली होती. त्यानंतर विनेश फोगाट डिप्रेशनमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला कुस्ती थांबवण्याचं आवाहन देखील केलं होतं. पण विनेश थांबली नाही. एकीकडे रस्त्यावर कुस्तीपटूंसाठी उभी असताना विनेशने सराव करत होती. कुटुंबाने तिला प्रेरित केलं आणि तिला नेहमीच पाठिंबा दिला. कुटुंबाच्या पाठिंब्याने विनेश बरी झाली. कुस्तीमध्ये परतली आणि राष्ट्रकुलमध्ये गोल्ड जिंकलं. त्यानंतर आता विनेशने सर्व आव्हान पार करत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली होती.