मुंबई : भारतीय क्रिकेटपटू लोकप्रिय आहेतच पण त्याचबरोबर त्यांची टोपणनावेही सर्वांच्याच चांगली परिचयाची आहेत. टीममध्ये अनेकदा ते एकमेकांना याच खास नावांना हाक मारतात. पण ही नावे त्यांना कशी पडली हे तुम्हाला माहित आहे का? तर त्यामागच्या कहाण्या देखील नावांप्रमाणेच इंटरेस्टिंग आहेत. जाणून घेऊया काय आहेत क्रिकेटपटूंचे निकनेम्स आणि त्यामागची स्टोरी...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एसएस धोनीचे नाव महेंद्र असून त्याला माही या नावाने ओळखले जाते. त्याच्या इतकेच त्याचे माही हे नावही लोकप्रिय आहे. खरंतर धोनीची लोकप्रियता वाढताच त्याला लोकांनी माही या नावाने बोलवायला सुरुवात केली.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला चिकू या नावाने ओळखले जाते. त्यामागेही रंजक कहाणी आहे. विराटेचे कान मोठे आहेत. ते छोटे करण्याच्या नादात विराटने ते खेचले आणि ते अधिक मोठे झाले. त्याचे कान मोठे असल्याचे सर्वप्रथम त्याच्या कोचने नोटिस केले आणि विराटला पाहताच त्यांना चंपक या बाल मासिकातील चिकूचे पात्र (ससा) आठवला. तेव्हापासून कोचने आणि त्यानंतर टिमनेही विराटला चिकू हाक मारायला सुरुवात केली.
शिखर धवनला कोणीही शिखर हाक मारत नाही. तर सगळे गब्बर बोलतात. रणजी मॅचदरम्यान धवनला हे नाव पडले आहे. विजय दहियाने हे नाव त्याला दिले. शिखर सामान्यपणे सिली प्वाईंटला फिल्डिंग करत असे आणि टीमचे धैर्य वाढण्यासाठी वेगवेगळे डायलॉग बोलत असे. एकदा गोलंदाज रन अपसाठी धावत असताना शिखर बोलला की, बहुत याराना लगता है. शिखरचा हा डायलॉग ऐकून सर्वजण हसू लागले आणि त्यांनी शिखरला गब्बर हे नाव दिले.
युवराज सिंगला सगळे युवी हे नाव लोकप्रिय आहे. हे नाव त्याला त्याच्या चाहत्यांनी दिले आहे.
हार्दीक पांड्या आपल्या खेळासोबत केसांच्या स्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असतो. सतत बदलणाऱ्या त्याच्या हेअर स्टाईलमुळे त्याला हेअरी नाव दिले आहे. आयपीएलच्या मुंबई टीममध्ये तो रॉकस्टार म्हणूनही ओळखला जातो. पण सुरेश रैना त्याला नेमार म्हणून हाक मारतो.
मुरली विजयला द मॉन्क म्हणून बोलवले जाते. एकदा टक्कल करुन तो मैदानावर आला होता. तेव्हा कोणीतरी म्हटले की, मॉन्क सारखा वाटतोय आणि तेव्हापासून त्याचे नाव मॉन्क पडले.
टीम इंडियाचा रिस्ट स्पिनर युजवेंद्र चहलला त्याचे साथीदार युजी म्हणून संबोधतात. पण त्याचा मित्र एंड्रयू सायमंड्सला त्याच्या पत्नीने चहलला अॅपल नाव दिले आहे. त्याचे बायसेप्स पाहून त्याला हे नाव देण्यात आले आहे.