बंगळुरू : कोलकात्याचा ओपनर क्रिस लिननं केलेल्या नाबाद ६२ रनमुळे आयपीएलच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेटनं पराभव झाला. बंगळुरूनं पहिले बॅटिंग करून २० ओव्हरमध्ये १७५ रन केले. बंगळुरूचं हे आव्हान कोलकात्यानं १९.१ ओव्हरमध्ये चार विकेट गमावून पूर्ण केलं. कोलकात्याचा ८ मॅचमधला हा चौथा विजय आहे. तर बंगळुरूचा ७ मॅचमधला हा पाचवा पराभव आहे. या मॅचमध्ये विराट कोहलीनं ६९ रन बनवले. ४८ बॉलमध्ये खेळलेल्या या खेळीमध्ये ३ सिक्स आणि ५ फोरचा समावेश होता. विराटच्या या खेळीनंतरही बंगळुरूचा ६ विकेटनं पराभव झाला. बंगळुरूच्या टीममध्ये सध्या विराट आणि एबी डिव्हिलियर्स हे जगातले सर्वोत्तम खेळाडू आहेत. तरीही पॉईंट्स टेबलमध्ये बंगळुरूची टीम सातव्या क्रमांकावर आहे.
टीमचा पराभव होत असला तरी विराट कोहली मात्र मेहनत करताना दिसत आहे. याचाच एक व्हिडिओ विराटनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट कोहली ८.९० सेकंदांमध्ये तीन रन पूर्ण करताना दिसत आहे. यापेक्षा कमी वेळेमध्ये तीन रन पूर्ण करण्याचं आव्हान आता विराटनं बंगळुरूचा खेळाडू मनदीप सिंगला दिलं आहे.
Think you can run faster than me? Here’s my fastest time for 3 runs. Pad up and send a video of your fastest 3 runs mentioning #NewLevels and @PUMACricket . @mandeeps12 let’s see if you can beat 8.90 sec mundeya! pic.twitter.com/UOdl64NZs6
— Virat Kohli (@imVkohli) April 28, 2018