VIDEO:चूक केल्यावर मुंबईच्या टीमला मिळते ही शिक्षा

मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची यंदाच्या मोसमातली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.

Updated: Apr 30, 2018, 08:29 PM IST
VIDEO:चूक केल्यावर मुंबईच्या टीमला मिळते ही शिक्षा  title=

बंगळुरू : मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची यंदाच्या मोसमातली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. आत्तापर्यंतच्या ७ मॅचमध्ये मुंबईला फक्त दोनच मॅच जिंकता आल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये चेन्नईसारख्या तगड्या टीमचा मुंबईनं पराभव केला. या विजयानंतर आता मुंबईचा सामना मंगळवारी बंगळुरूशी होणार आहे. मुंबईसारखीच बंगळुरूची कामगिरीही निराशाजनक झाली आहे. बंगळुरूलाही त्यांच्या ७ पैकी २ मॅच जिंकता आल्या आहेत. मुंबई आणि बंगळुरूचे पॉईंट्स टेबलमध्ये चार-चार पॉईंट्स आहेत. पण रन रेट चांगला असल्यामुळे मुंबई सहाव्या आणि बंगळुरू सातव्या क्रमांकावर आहे.

मुंबईची टीम बंगळुरूला पोहोचली

बंगळुरूविरुद्धच्या मॅचसाठी मुंबईची टीम बंगळुरूला पोहोचली आहे. याचा व्हिडिओ टीमच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यातल्या काही खेळाडूंना शिक्षा देण्यात आल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे.

मुंबईच्या खेळाडूंना शिक्षा

सरावासाठी उशीरा आल्यामुळे या खेळाडूंना ही अनोखी शिक्षा देण्यात आली आहे. या खेळाडूंना स्लीपवेअर म्हणजेच जंपसूट घालून प्रवास करावा लागला आहे. राहुल चहर, ईशान किशन आणि अनुकूल रॉय यांना ही शिक्षा देण्यात आली.