मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीकडून दोन भावांचं निलंबन

मॅच फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने तीन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. 

Updated: Aug 27, 2019, 07:40 PM IST
मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीकडून दोन भावांचं निलंबन title=

दुबई : मॅच फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने तीन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. आयसीसीने हाँगकाँगचे क्रिकेटपटू इरफान अहमद आणि नदीम अहमद यांच्यावर कायमची बंदी घातली आहे. याचसोबत हाँगकाँगच्या टीममधला आणखी एक खेळाडू हसीब अमजद याच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. इरफान अहमद आणि नदीम अहमद हे भाऊ आहेत. 

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार हे तिन्ही खेळाडू आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाने केलेल्या चौकशीत दोषी आढळले. या खेळाडूंनी मागच्या २ वर्षात अनेक मॅच फिक्स केल्या. या खेळाडूंनी मॅचचा निकाल प्रभावित करण्यासाठी लाच घेतली. 

इरफानने १३ जानेवारी २०१४ ला हाँगकाँग विरुद्ध स्कॉटलंड या मॅचमध्ये, १७ जानेवारी २०१४ साली हाँगकाँग-कॅनडा मॅचमध्ये, १२ मार्च २०१४ ला झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये फिक्सिंग केलं. इरफानने हाँगकाँगसाठी ६ वनडे आणि ८ टी-२० मॅच खेळल्या होत्या.