क्रिकेटमधले 4 सर्वात वजनदार खेळाडू, ज्यांनी आपल्या कामगिरीने केले लोकांना प्रभावित

क्रिकेटमधले हे 4 खेळाडू जे कामगिरीतही आहेत वजनदार

Updated: Jul 17, 2022, 11:12 PM IST
क्रिकेटमधले 4 सर्वात वजनदार खेळाडू, ज्यांनी आपल्या कामगिरीने केले लोकांना प्रभावित title=

मुंबई : सध्याच्या काळात क्रिकेट खेळत असताना आता फिटनेसकडे देखील तितकंच महत्त्व दिले जाते. यशाची चव चाखण्यासाठी हा आता एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. खेळाडूला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी फिटनेस अधिक चांगला असायला हवा.

पण असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी फिटनेसच्या बाबतीत जाड असताना देखील क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या खेळाडूंनी आपण ज्याला ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ म्हणतो त्याचा अर्थच बदलून टाकला आहे. कारण त्यांनी तथाकथित ‘फिट’ क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. या बातमीत 4 ओव्हरवेट क्रिकेटर्सची यादी आहे ज्यांनी त्यांच्या कामगिरीमुळे वजनाच्या समस्येच्या पलीकडे जावून प्रभावित केले आहे.

1. ऋषभ पंत

सध्या ऋषभ पंत हा भारतीय क्रिकेट संघाचा एक आधारस्तंभ आहे. पंतने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे सर्वात ऐतिहासिक खेळी खेळली गेली. पण पंतच्या वजनावर (ओव्हरवेट क्रिकेटर्स) नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात.

अनेकवेळा ऋषभ पंत शॉट्स खेळताना जमिनीवर पडताना दिसतो. अर्थात ते खेळताना आकर्षक दिसत नाहीत पण ते टीम इंडियासाठी सर्वात मोठे हत्यार आहे, ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 कसोटी, 26 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळला आहे.

LSG vs DC IPL 2022: Rishabh Pant fined THIS huge amount, faces BAN later in  tournament | Cricket News | Zee News

2. पॉल स्टर्लिंग

आयर्लंड क्रिकेट संघाचा सदस्य पॉल स्टर्लिंगने जगातील जास्त वजन असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या या खेळाडूला T20 क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली सलामीवीर म्हणता येईल. त्याच्या शारीरिक ताकदीच्या जोरावर जगातील कोणत्याही मैदानावर षटकार ठोकण्याची क्षमता आहे.

पॉल स्टर्लिंग सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. तो आयर्लंडचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. स्टर्लिंगने 138 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5172 धावा केल्या आहेत, तसेच 104 सामन्यांमध्ये 2820 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 325 चौकार लागले आहेत.

Ireland cricketer Paul Stirling now in superhit performance 4 hundreds in 7  innings | 105 के औसत से रन बना रहा है आयरलैंड का बल्लेबाज, पिछले 7 मैच में  बल्ले ने उगली

3. रहकीम कॉर्नवॉल

6'5 उंच, राहकीम हा 140 किलो वजनासह कॉर्नवॉल क्रिकेट संघातील सर्वात उंच खेळाडू आहे. अँटिग्वामध्ये जन्मलेला हा खेळाडू त्याच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीसोबतच त्याच्या फलंदाजीसाठीही ओळखला जातो. पण याशिवाय त्याचे वजन (ओव्हरवेट क्रिकेटर्स) ही त्याची ओळख बनली आहे.

26 वर्षीय रहकीम कॉर्नवॉल 2017 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याने सेंट किट्स येथे सराव सामन्यात बेन स्टोक्स, आदिल रशीद आणि ख्रिस वोक्स सारख्या बलाढ्य खेळाडूंच्या इंग्लंड संघाविरुद्ध केवळ 61 चेंडूत 59 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले.

Rahkeem Cornwall की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in  Hindi - Zee News Hindi

4. अहमद शेहजाद

मोहम्मद शहजाद हा अफगाणिस्तानच्या सर्वात प्रसिद्ध फलंदाजांपैकी एक आहे, तो यष्टिरक्षकाचीही भूमिका बजावतो. त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा, या खेळाडूने केलेल्या बहुतेक धावा सहसा चौकारांवर येतात. सुमारे 90 किलोपेक्षा जास्त वजन (ओव्हरवेट क्रिकेटर्स) या खेळाडूची चपळताही चांगली आहे.

अहमद शाहजाबने अफगाणिस्तानसाठी 80 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने सुमारे 90 च्या स्ट्राइक रेटने 2600 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याचा विक्रम अभूतपूर्व असला तरी त्याने 64 सामन्यांमध्ये 135 च्या स्ट्राइक रेटने 1860 धावा केल्या आहेत.

India vs Afghanistan Match 6, Asia Cup 2018 Super Four: Mohammad Shahzad  Slams 5th ODI Ton, Joins Shahid Afridi to Unique Record, Sets Twitter on  Fire — WATCH | India.com