नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साऊथ आफ्रीकेच्या टीमने रडीचा डाव सुरू केल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने यावर प्रतिक्रीया दिली आहे.
विकेट दोन्ही टीमसाठी सारखी आहे. आम्ही यावर खेळू आणि जिंकू. या पिचवर बॉल उसळी घेणं हे सामान्य आहे. हे खतरनाक अजिबात नाही, असे अजिंक्य म्हणाला.
मला बॉल लागल्यावर तुला फिजिओची गरज आहे का ? असे अम्पायर सारखे विचारत होते.
जर तुम्ही नव्या बॉलचा सामना करताय तर कठीण असेलच पण तुम्ही याला खतरनाक विकेट म्हणू नाही शकत असेही त्याने सांगितले.
तिसऱ्या दिवशी टीम इंडिया २४७ रन्सवर ऑल आऊट झाली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४१ रन्सचं आव्हान दिलं आहे.
टीम इंडियाने केलेल्या या स्कोअरमुळे भारताला विजयाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.