सेंच्युरीचे सेलिब्रेशन सोडून दीप्ती शर्मावरच भडकली हरमनप्रीत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने शानदार सेंच्युरी ठोकली. मात्र जेव्हा सेंच्युरी पूर्ण झाली तेव्हा त्याचे सेलिब्रेशन करण्याऐवजी मैदानात तिचा दुर्गावतार पाहायला मिळाला. 

Updated: Jul 20, 2017, 08:53 PM IST
सेंच्युरीचे सेलिब्रेशन सोडून दीप्ती शर्मावरच भडकली हरमनप्रीत  title=

डर्बी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने शानदार सेंच्युरी ठोकली. मात्र जेव्हा सेंच्युरी पूर्ण झाली तेव्हा त्याचे सेलिब्रेशन करण्याऐवजी मैदानात तिचा दुर्गावतार पाहायला मिळाला. 

३५व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलमध्ये दोन धावा काढत हरमनप्रीतने आपली सेंच्युरी पूर्ण केले. मात्र यावेळी धावा काढण्याच्या प्रयत्ना दीप्ती मात्र बाद झाली असती. 

बीम्सच्या बॉलवर कौरने फटका मारला. यावेळी कौरला एका धावेऐवजी दोन धावा हव्या होत्या. त्यामुळे तिने दुसरी धाव काढण्यास सुरुवात केली. मात्र दुसऱ्या बाजूने दीप्ती उभीच होती. यावेळी दुसरी धाव काढत असतानाच कौर दीप्तीवर भडकली. 

अखेर दीप्तीने धावत धाव पूर्ण केली मात्र अंपायरनी थर्ड अंपायरचा निर्णय घेण्याचे ठरवले. यात थर्ड अंपायरने दीप्तीला नाबाद ठरवले आणि कौरने आपली सेंच्युरी पूर्ण केली.