LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याने दाखवला Attitude, सोशल मीडियावर ट्रोल

हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकसोबत जे केलं ते तुम्हाला तरी पटलं का? 

Updated: Jun 10, 2022, 12:28 PM IST
LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याने दाखवला Attitude, सोशल मीडियावर ट्रोल title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने पहिला सामना गमवला आहे. 7 विकेट्सने सामना गमवल्यानंतर आता हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आपला Attitude दाखवल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक क्रिझवर खेळत होते. त्यावेळी पांड्याने आपल्या सीनियर खेळाडूला Attitude दाखवला अशी चर्चा आहे. त्याच्या या वर्तनामुळे पांड्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांनी मोठी निराशा व्यक्त केली.

टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान, हार्दिक पंड्याने डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाचवा बॉल खेळल्यानंतर दिनेश कार्तिकला स्ट्राइक देण्यास नकार दिला. शेवटची ओव्हर दक्षिण आफ्रिकेकडून एनरिकने टाकली यावेळी पांड्या खेळत होता. पण त्याने दिनेश कार्तिकला स्ट्राइक देण्यास नकार दिला. 

दिनेश कार्तिकला स्ट्राईक न दिल्याने चाहत्यांनी पांड्याला त्याच्या वागणुकीवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली. हार्दिक पांड्या शेवटच्या बॉलवर फार चांगलं खेळला असंही नाही. त्याला फक्त दोन धावा काढता आल्या. त्यामुळे चाहते संतापले तर काही क्रिकेटप्रेमींनी निराशा व्यक्त केली. 

टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला.  पहिल्यांदा फलंदाजी करून टीम इंडियाने 212 धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खराब फिल्डिंगचा फायदा घेतला. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं झालं.