हार्दिक पंड्या घेणार सहका-यांकडून ‘त्या’ गोष्टीचा बदला

टीम इंडियाचे क्रिकेटर मैदानावर फटकेबाजी करण्यासोबतच धमाल-मस्ती करण्यातही मागे नाहीयेत. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला.

Updated: Oct 18, 2017, 09:52 AM IST
हार्दिक पंड्या घेणार सहका-यांकडून ‘त्या’ गोष्टीचा बदला title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचे क्रिकेटर मैदानावर फटकेबाजी करण्यासोबतच धमाल-मस्ती करण्यातही मागे नाहीयेत. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला.

त्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ नुकताच त्याने शेअर केलाय. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. 

हार्दिकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, युजवेंद्र चहल, रोहित शर्मा, आशिष नेहरा, मनीष पांडे, शिखर धवन, कुलदीप यादवसोबत आणखी खेळाडू आहेत. पंड्याच्या वाढदिवस होता त्या दिवशी बॅटींग कोच संजय बांगर आणि फिजिओ पॅट्रिक फरहार्ट याचाही वाढदिवस होता. ११ ऑक्टोबरला तिघांचाही वाढदिवस एकत्र साजरा करण्यात आला. 

 

Everyone's birthday comes once a year... revenge will be "sweet"  #cakesmash #throwback #birthday #teamindia

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

यात पंड्याची टी-शर्ट काढून त्याच्या शरिरावर केक माखल्याचं दिसतं आहे. पंड्याने हा व्हिडिओ शेअर करत आपल्या सहकारी खेळाडूंचा ‘स्वीट’ बदला घेण्याचा इशारा दिलाय. त्याने लिहिले की, वर्षातून एकदा सर्वांचाच वाढदिवस येतो, याचा बदला ‘स्वीट’ असेल. हा व्हिडिओ आतापर्यंत ७ लाख लोकांनी पाहिला आहे.