अरे हा तर बाहुबली! एका पायावर कुंफू, पांड्याने लावला गगनचुंबी षटकार Video व्हायरल

न्यूझीलंडचा हुकमी गोलंदाज असलेला टीम साऊथीला सर्वांना हैराण करून टाकणारा सिक्सर मारला.

Updated: Nov 22, 2022, 08:56 PM IST
अरे हा तर बाहुबली! एका पायावर कुंफू, पांड्याने लावला गगनचुंबी षटकार Video व्हायरल title=

Hardik Pandya six vs New Zealand : भारताने न्यूझीलंडविरूद्धची तीन सामन्यांची टी 20 मालिका 1-0 ने खिशात घातली आहे. (New Zealand vs India) मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत आघाडी घेतली होती. आजचा तिसरा सामनाही पावसामुळे टाय झाला. आजच्या मॅचमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने मारलेल्या एका षटकाराची (Hardik Pandya Six) चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.  (nz vs ind 3rd t 20i new zealand vs india match tied india win series at mclean park napier)

हार्दिक पांड्याने सामन्याच्या पाचव्या षटकामध्ये न्यूझीलंडचा हुकमी गोलंदाज असलेला टीम साऊथीला सर्वांना हैराण करून टाकणारा सिक्सर मारला. साऊथीने पांड्याच्या विकेटसाठी एक तिखट बाऊंसर टाकला मात्र पठ्ठ्याने एका पायावर हलकिशी उडी घेत बॉल टोलावला. पांडयाने मारलेला हा बॉल थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. आजचा सामना जरी टाय झाला असला तरी हा सिक्स मात्र लक्षवेधी ठरला. 

आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये 160 धावांवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.  धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरूवात एकदम खराब झाली. 

सामन्याचा धावता आढावा 
न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये  160 धावांवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद सिराजने 17 आणि  अर्शदीपने 37 धावा देत प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. सिराजला सामनावीर तर सूर्यकुमारला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.  दरम्यान, आता एकदिवसीय सामन्यांची मालिका 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.