IND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार 'हा' खेळाडू!

Prithvi Shaw,Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल. 

Updated: Jan 31, 2023, 07:45 PM IST
IND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार 'हा' खेळाडू! title=
hardik pandya,Prithvi Shaw,Ishan Kishan

IND vs NZ 3rd T20 Match: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) 3 सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका (T20I Series) खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पहायला लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी न्यूझीलंडला फक्त 99 धावांवर रोखलं होतं. मात्र, 100 धावांचा पाठलाग करणं फलंदाजांना अवघड गेलं. अखेरच्या षटकात सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) चौकार खेचत सामना पारड्यात आणला होता. त्यानंतर आता तिसऱ्या सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही संघासाठी 'करो या मरो' असा असणार आहे. (hardik pandya may replace Prithvi Shaw with Ishan Kishan in IND vs NZ 3rd T20I Match marathi sports news)

भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल. अशातच आता तिसऱ्या सामन्याआधी कॅप्टन पांड्या (Hardik pandya) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी सामन्यात सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) प्लेइंग 11 मधून वगळलं जाऊ शकतं. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघात अशा खेळाडूचा समावेश करू शकतो जो 18 महिन्यांनंतर भारतीय संघाचा भाग झालाय.

आणखी वाचा - Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!

पुढील सामन्यात हार्दिक पांड्या ईशान किशनच्या जागी सलामीवीर पृथ्वी शॉ याला (Prithvi Shaw) संघात संधी देऊ शकतो. पृथ्वी शॉनेही अलीकडे डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याचं फलित त्याला सध्याच्या सिरीजमध्ये मिळालं. परंतु या मालिकेत त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. 

दरम्यान, पृथ्वी शॉ शेवटचा 2021 साली श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. त्यानंतर आता त्याला उद्याच्या सामन्यात (IND vs NZ 3rd T20) संधी मिळणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ -

हार्दिक पंड्या (C), सूर्यकुमार यादव (VC), इशान किशन (WK), शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (WK), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.