Rohit Sharma: येत्या 22 तारखेपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात रंगणार आहे. या सिझनपूर्वी मुंबई इंडियन्सचे ( Rohit Sharma ) चाहते टीम मॅनेजमेंटवर काही प्रमाणात नाराज आहेत. याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याकडे ( Rohit Sharma ) कर्णधारपद सोपवलं आहे.
गुजरात टायटन्ससाठी दोन सिझन खेळणाऱ्या आणि पहिल्यांदाच विजेतेपद मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सने पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. याशिवाय हार्दिकला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधारही बनवण्यात आलं आहे. यानंतर स्टार स्पोर्ट्सला मुलाखत देताना हार्दिक पंड्या खोटं बोलत असल्याचं दिसून आलं. नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहुयात.
2015 साली हार्दिक पंड्याचं आयपीएलमध्ये डेब्यू झालं होतं. आयपीएलच्या त्या सिझनमध्ये ट्रॉफी जिंकण्यात मुंबई इंडियन्सला यश आलं होतं. या इंटरव्ह्यूमध्ये हार्दिकला त्याच्या पहिल्या सीझनबद्दल विचारण्यात आलं. तो सीझन किती खास होता हे हार्दिकने सांगितलं. मात्र, हे सांगताना तो खोटं बोलल्याचा दावा करण्यात येतोय. पंड्याने ( Rohit Sharma ) सांगितलं की, त्या सिझनमध्ये त्याने दोन वेळा मॅन ऑफ द मॅचचं विजेतेपद पटकावलं होतं. याशिवाय हे दोन्ही अवॉर्ड त्याने दोन्ही बाद फेरीत जिंकली होती.
2015 च्या आयपीएल सिझनमध्ये मुंबईने 2 बाद सामने खेळले होते. त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिला क्वालिफायर खेळला. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 25 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यामध्ये किरॉन पोलार्डला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. अंतिम फेरीतही चेन्नई विरूद्ध मुंबई आमने सामने होते. अंतिम सामना मुंबई इंडियन्सने 41 रन्सने जिंकला. त्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) झंझावाती अर्धशतक झळकावले, ज्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे हार्दिक दोन्ही सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला नव्हता.
30 वर्षीय हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केल्यानंतर आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 145 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 2309 रन्स केले आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचाही समावेश असून 53 विकेट्सही घेतल्या आहेत.