कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी गांगुली यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोरोनाची लागण झाल्यानंतर 3 डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. गागुंली यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान सौरव गांगुली यांना ओमायक्रॉन व्हेरिएंटीची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे.
49 वर्षीय सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच अँटीबॉडी कॉकटेल थेरपी देण्यात आली. सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर वुडलँड रूग्णालयाने सौरव गांगुलीचे हेल्थ बुलेटिन नियमितरित्या जारी केलं.
सोमवारी रात्री सौरव गांगुलीची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गांगुलीला पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. सौरव गांगुलीला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असतानाही त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
देशात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता गांगुलीला संसर्ग होणे ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता.