हरभजनचा हा सल्ला टीम इंडियाने ऐकला असता तर...

भारताचा अनुभवी स्पिनर हऱभजन सिंगच्या मते द. आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिकेचा कमी फायदा झाला. 

Updated: Jan 22, 2018, 09:27 AM IST
हरभजनचा हा सल्ला टीम इंडियाने ऐकला असता तर... title=

कोलकाता : भारताचा अनुभवी स्पिनर हऱभजन सिंगच्या मते द. आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिकेचा कमी फायदा झाला. 

भारताने द. आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावलीये. हरभजनला जेव्हा द. आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या तयारीबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला, मला वाटते श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळलेल्या सीरिजचा तितकासा फायदा संघाला झाला नाही. यापेक्षा काही भारतीय खेळाडू आधी द. आफ्रिकेला गेले असते. द. आफ्रिका नव्हे तर तयारीसाठी धरमशालाही चांगली जागा होती. 

संघाला धरमशालेत सराव करायला हवा होता

द. आफ्रिकेविरुद्धच्या अवघड दौऱ्याआधी भारतीय संघाने धरमशालेत सराव करायला हवा होता. कारण धरमशालाचे स्टेडियम उचं ठिकाणी तसेच थंड हवामानामुळे तेथे सराव करणे संघासाठी अनुकूल ठरले असते.

कसोटी संघात रहाणेला स्थान न मिळण्याबाबत त्याला विचारले असता हरभजन म्हणाला, रहाणेला संघात स्थान मिळाले असते तर निर्णय वेगळा असता याची गँरंटी काय होती.

भुवनेश्वरला दुसऱ्या सामन्यात संधी न देणं हा विराटचा चुकीचा निर्णय

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भुवनेश्वरने चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यानंतरही त्याला दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली नाही.  भुवनेश्वरला संघात जागा मिळायला हवी होती. 

रहाणेला संघात स्थान द्यावे की नाही याबाबत अनेक मते असतील मात्र भुवनेश्वरला संघात स्थान दयायला हवे होते. आताच्या दौऱ्यायत भुवनेश्वर ईशांतच्या तुलनेत मोठा मॅचविनर आहे. भुवीने चांगली कामगिरी केली तेव्हा भारतीय संघानेही चांगले प्रदर्शन केले. मला नाही वाटत सगळं काही संपलंय. जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया मालिकेत पुनरागमन करेल, असे भुवनेश्वर म्हणाला.