टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा चायनीज ब्रॅण्डवर बहिष्कार, जाहिरातीही करणार नाही

लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधातली मोहीम आणखी आक्रमक झाली आहे.

Updated: Jun 20, 2020, 05:20 PM IST
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा चायनीज ब्रॅण्डवर बहिष्कार, जाहिरातीही करणार नाही title=

मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधातली मोहीम आणखी आक्रमक झाली आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या या मागणीला टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही पाठिंबा दिला आहे. कोणत्याही चायनीज ब्रॅण्डच्या वस्तूंची जाहिरात करणार नसल्याचा निर्णय हरभजनने घेतला आहे. 

१५ जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले. यानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढू लागली आहे. 

हरभजन सिंगने ट्विटरवर सगळ्या चायनीज वस्तूंवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने हरभजनच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. अशाप्रकारे चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालणारा हरभजन हा पहिलाच भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. हरभजनने पैशांपेक्षा देशाला जास्त महत्त्व दिलं, अशी प्रतिक्रिया सीएआयटीने दिली आहे. सीएआयटीने सेलिब्रिटींनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. 

हरभजन सिंगने भारताकडून खेळताना १०३ टेस्टमध्ये ४१७ विकेट, २३६ वनडेमध्ये २६९ विकेट आणि २८ टी-२०मध्ये २५ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये हरभजन सिंग चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो, पण सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.