HBD Rohit Sharma : गोलंदाज म्हणून सुरुवात करणारा रोहित आज जगातील सर्वोतम फलंदाजांपैकी एक

रोहितने त्याच्या करियरमध्ये अनेक संघर्षांचा सामना केला आहे.

Updated: Apr 30, 2022, 09:05 AM IST
HBD Rohit Sharma : गोलंदाज म्हणून सुरुवात करणारा रोहित आज जगातील सर्वोतम फलंदाजांपैकी एक title=

मुंबई : जगभरातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) चं नाव घेतलं जातं. विराट कोहलीनंतर आता रोहित शर्मा टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार बनला आहे. आजचा दिवस रोहितसाठी खूप खास आहे कारण रोहित आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करतोय. वनडे इंटरनॅशनलमध्ये 3 वेळा 200 रन्स ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 

रोहितने त्याच्या करियरमध्ये अनेक संघर्षांचा सामना केला आहे. गरीबीमुळे तो त्याच्या आई वडिलांपासूनही दूर राहायचा. त्यावेळी आठवड्यातून एकदा तो आई-वडिलांना भेटायला जात असे. मात्र आज रोहित शर्मा ज्या शिखरावर पोहोचला आहे ते इतरांसाठी फार प्रेरणादायक आहे.

रोहित शर्माचा जन्म नागपूरमध्ये झाला. त्याची आई पोर्णिमा मूळची आंध्र प्रदेशाची होती तर वडील गुरुनाख शर्मा ट्रांसपोर्ट फर्ममध्ये कामाला होते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तो मुंबईतीव बोरीवलीमध्ये आजोबा आणि काकांसोबत रहायचा. यावेळी आठवड्यातून एकदा तो डोंबिवलीला त्याच्या पालकांना भेटायला जायचा. 

रोहितने 1999 मध्ये काकांची आर्थिक मदत घेऊन एका क्रिकेट कँपमध्ये भाग घेतला होता. त्या कॅम्पचे कोच दिनेश लाड यांनी त्याला शाळा बदलण्यास सांगितलं. मात्र रोहित शर्मा यासाठी तयार नव्हता. मात्र अखेरीस त्याने शाळा बदलण्याचा निर्णय घेतलायच.

शाळा बदलल्यामुळे रोहित शर्माला स्कॉरलशिप मिळाली. यावेळी त्याने क्रिकेटरची सुरुवात गोलंदाज म्हणून केली होती. ऑफ स्पिनर गोलंदाज म्हणून तो ओळखला जात होता. 

मात्र कोच दिनेश लाड यांनी त्याची फलंदाजी पाहिली आणि त्याला फलंदाज म्हणून 8व्या नंबरवरून ओपनिंगना पाठवलं. हॅरिस शिल्ड टूर्नामेंटमध्ये रोहितने हा निर्णय योग्य ठरवत ओपनर डेब्यू सामन्यात शतक ठोकलं. त्यामुळे प्रथम गोलंदाज म्हणून खेळणारा रोहित शर्मा आज जगातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे.