झारखंडचा उद्योन्मुख खेळाडू रॉबिन मिंझचा अपघात झाला आहे. त्याच्या वडिलांनी अपघात झाल्याची माहिती दिली आहे. आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने त्याला 3 कोटी 60 लाखात खरेदी केल्यानंतर चर्चेत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोठे फटके लगावण्यासाठी प्रसिद्ध असणारा रॉबिन मिंझ कावासाकीची सुपरबाईक चालवत असताना हा अपघात झाला. दुसऱ्या दुचाकीच्या संपर्कात आल्याने त्याचा तोल गेला आणि अपघात झाला. रॉबिन मिंझच्या वडिलांनी अपघात झाल्याच्या वृत्ता दुजोरा दिला आहे. "दुसऱ्या दुचाकीच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. सध्यातरी चिंतेची काही बाब नसून, काही गंभीर बाब नाही. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे," अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, बाईकचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. डाव्या हाताच्या या फलंदाजाच्या उजव्या गुडघ्याला जखमा झाल्या आहेत. मोठे फटके लगावण्यास सक्षम असणाऱ्या रॉबिन मिंझला पोलार्ड म्हणूनही ओळखलं जातं. तो धोनीचा खूप मोठा चाहता आहे. चंचल भट्टाचार्य यांनी रॉबिन मिंझला प्रशिक्षण दिलं असून, त्यांनीच भारताच्या माजी कर्णधारालाही प्रशिक्षण दिलं आहे.
रॉबिन मिंझ मूळचा झारखंडच्या गुमला जिल्ह्याचा आहे. मुंबई इंडियन्समुळे रॉबिन मिंझची खऱ्या अर्थाने जगाला ओळख दिली. त्यांनी युकेमध्ये प्रशिक्षणासाठी त्याला मदत केली. सध्या झारखंडची राजधानी रांची येथील नामकुम परिसरात राहणाऱ्या मिन्झने अद्याप रणजी ट्रॉफीमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले नसतानाही झारखंडच्या अंडर 19 आणि अंडर 25 संघांचा भाग आहे.
रॉबिन मिंझचे वडील निवृत्त लष्कर कर्मचारी आहे. सध्या ते रांचीमधील बिरसा मुंदा विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रॉबिन मिंझला दोन लहान बहिणी आहेत.
मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त, रॉबिन मिंझने लखनऊ सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्ससह विविध फ्रँचायझींसोबत ट्रायलला हजेरी लावली आहे. IPL 2023 च्या लिलावात विकला गेलेला नसतानाही त्याने चांगली कमाई केली होती. दरम्यान सध्याच्या लिलावात रॉबिन मिंझ पदार्पण करण्याची शक्यता आहे. प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉबिन मिंझ आणि वृद्धिमान साहा यांच्यात लढत आहे.
रॉबिन मिंज झारखंडकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याला 'रांचीचा गेल' नावाने ओळखलं जातं. रॉबिन मिंजने विकेटकिपर फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. 2022 मध्ये ओडिशामधील एका टी-20 मालिकेत त्याने 35 चेंडूत 73 धावा ठोकल्या होत्या. या खेळीने त्याला ओळख मिळवून दिली होती. रॉबिनच्या याच कामगिरीने प्रभावित होऊन गतवर्षी आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सने त्याला ट्रायलसाठी बोलावलं होतं.
22 मार्चपासून आयपीएल हंगामाला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल खेळणार नाही आहे. तर दुसरीकडे कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई संघात सामील झाला आहे. यामुळे नवख्या शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. हार्दिकने 2022 मध्ये गुजरातला आयपीएलचा खिताब मिळवून दिला होता. तर गतवर्षी उपविजेता संघ ठरला होता. त्यामुळे यावेळी शुभमन गिल ही यशस्वी कामगिरी पुढे कायम ठेवेल अशी आशा व्यक्त होत आहे.
शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नलकंडे, उमेश यादव, अजमतुल्ला उमरजई, विजय शंकर, जयंत यादव, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रॉबिन सुतार, मानव सुथार. रॉबिन मिंझ, मोहम्मद शमी, नूर अहमद, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, साई किशोर, राशीद खान