गुजरातशिवाय Playoff साठी या 3 टीमची नावं आघाडीवर

धोनीच्या CSK ला Playoff मध्ये संधी मिळणार की नाही पाहा, कोणत्या टीम दावेदार

Updated: May 3, 2022, 04:27 PM IST
गुजरातशिवाय Playoff साठी या 3 टीमची नावं आघाडीवर title=

मुंबई : आयपीएलमध्ये 5 किंवा चार ट्रॉफी जिंकलेली टीम यावेळी प्लेऑफपर्यंत पोहोचेल की नाही याची शंका आहे. यंदाच्या हंगामात 2 नव्या टीम आल्या आहेत. त्याची कामगिरी सुसाट आहे. या दोन्ही टीमने प्लेऑफचं तिकीट पक्क केल्याचं दिसत आहे. 

यंदाच्या प्लेऑफमध्ये गुजरात सोडून आणखी कोणत्या टीम खेळणार याची उत्सकता आहे. मात्र सध्या असलेल्या आकडेवारीवरून तीन टीमची नावं आघाडीवर आहेत. या टीम कोणत्या आहेत जाणून घेऊया. 

1 लखनऊ

गुजरातनंतर सर्वोत्तम प्रदर्शन करणारी टीम म्हणून लखनऊचं नाव घेतलं जातं. लखनऊने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. या टीमचं नेतृत्व के एल राहुल करत आहे. क्विंटन आणि के एल राहुल दोघंही तुफान फलंदाजी करताना दिसत आहेत. 

आयुष बदोनीनं आपली उत्तम कामगिरी करून अनेक मॅच फिरवल्या. त्यामुळे या खेळाडूचं श्रेयही मोठं आहे. या टीमला आणखी एक सामना जिंकयचा आहे. त्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे. 

2 राजस्थान

राजस्थान टीममध्ये फलंदाजी खूप मजबूत आहे. तर दुसरीकडे युजवेंद्र चहलने उत्तम कामगिरी बॉलिंगमध्ये केली आहे. त्यामुळे ही टीमही स्ट्राँग असल्याची चर्चा आहे. राजस्थाननं 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आर अश्विन, युवेंद्र मिळून बॉलिंगची कमान सांभाळत आहेत. 

3 हैदराबाद

हैदराबाद टीम सुरुवातीचे सामने पराभूत झाले होते. मात्र त्यांनी दमदार पुनरागमन केलं. केनची टीम उत्तम कामगिरी करत आहे. उमरान मलिकची कमाल टीममध्ये पाहायला मिळत आहे. भुवनेश्वर कुमार, उमरानसारखे खेळाडू हैदराबादला प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सोपा करू शकतात.

CSK प्लेऑफला पोहोचणार का?

 चेन्नईने जर उरलेले पाचही सामने जिंकले तर 16 गुण मिळवून प्लेऑफमध्ये चेन्नई पोहोचू शकते. पुढचा एकही सामना जर चेन्नई टीम पराभूत झाली तर प्लेऑफच्या आशा मावळल्या. मात्र पाचही सामने एकामागे एक जिंकले तर प्लेऑफचं तिकीट नक्की आहे. 

दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेट रनरेटची काळजीही घ्यावी लागणार आहे. कोलकाता, पंजाब टीम स्पर्धेत आहेत. त्यामुळे नेट रनरेट सांभाळणं चेन्नईसाठी महत्त्वाचं असेल.