आयपीएल लिलाव: 20 लाख होती बेस प्राईज, मिळाले 6,20,00000

आयपीएल सीजन 11 च्या लिलावामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स जरी सर्वात महाग खेळाडू ठरला असेल तरी भारतीय खेळाडू देखील मागे नाही आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 28, 2018, 04:23 PM IST
आयपीएल लिलाव: 20 लाख होती बेस प्राईज, मिळाले 6,20,00000 title=

नवी दिल्ली : आयपीएल सीजन 11 च्या लिलावामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स जरी सर्वात महाग खेळाडू ठरला असेल तरी भारतीय खेळाडू देखील मागे नाही आहेत.

भारतीय खेळाडूंची ही चलती

भारताच्या जयदेव उनादकटने तर सगळ्यांनाच हैराण करुन टाकलं. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये दुसऱ्या दिवशी झालेल्या लिलावात जयदेव सर्वात महागडा खेळाडू ठरला. कर्नाटकच्या हरफनमौला कृष्‍णप्‍पा गौतमने देखील त्याच्यावरील बोलीने अनेकांना हैराण करुन टाकलं.

31 टक्के जास्त रक्कम

दुसऱ्या दिवशी झालेल्या लिलावात त्याच्यावर ६ कोटी 20 लाखांची बोली लागली. गौतमची बेस प्राइस फ्कत 20 लाख होती. 29 वर्षाच्या या खेळाडूने बेस प्राईजच्या 31 टक्के जास्त रक्कम मिळवली. गौतमची बॉलिंग आणि बँटींगमुळे त्याला मुंबई इंडियन्सने मागच्या वर्षी 2 कोटींना खरेदी केलं होतं.

मागच्या वर्षी त्याला 11 खेळाडूंमध्ये स्थान नाही मिळालं. मागच्या वर्षी पुणे सुपरजाइंट्सचा पराभव करत मुंबई इंडियन्सने कप जिंकला होता.