नवी दिल्ली : भारतातील युवा गोलंदाज जयदेव उनादकट या वर्षी आयपीएलच्या लिलावातील सर्वात महाग खेळाडू ठरले आहेत. जयदेवला रविवारी राजस्थान रॉयल्सने ११.५ कोटी रूपयात खरेदी केलं.
जयदेवला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेवन पंजाब, आणि चैन्नई सुपर किंग्जशी टक्कर घेतली.
मनीष पांडे आणि लोकेश राहुल शनिवारच्या लिलावात सर्वात महागडे खेळाडू होते. दोन्ही खेळाडूंना ११ कोटी रूपयात खरेदी करण्यात आलं होतं. पांडेला सनराईजर्सने हैदराबादने तर राहुलला पंजाबने खरेदी केलं.
इंग्लंडचे बेन स्टोक्स मागील वर्षासारखा, या वर्षी देखील महागात विकला गेला. स्टोक्सला १२.५ कोटी रूपयात खरेदी करण्यात राजस्थान रॉयल्सला यश मिळालं.
महिपाल लोमरारला राजस्थान रॉयल्सने २० लाखात खरेदी केलं
मार्क वूडला चेन्नई सुपरकिंग्जने १ कोटी ५० लाखात खरेदी केलं
अतिसय राज डेविडसनने पुन्हा विकला गेला नाही
मयंक डागरला किंग्ज इलेवन पंजाबने २० लाखात खरेदी केलं
झार्ड रिचर्डसनने विकला नाही गेला
थिपासा परेराला कुणीही खरेदी केलं नाही
प्रदिप साहूला किंग्ज इलेवन पंजाबने २० लाखात खरेदी केलं
विकास टोकस, समित पटेल विकला नाही गेला
अकिला धनंजयला मुंबई इंडियन्सने ५० लाखात खरेदी केलं